Mumbai Crime : मुंबईच्या अंधेरी परिसरात काम करत असलेल्या एका 28 वर्षीय महिला डॉक्टरसोबत एक संतापजनक प्रकार घडला आहे. मुंबईतील डोंगरीमध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय तरुणावर शारीरिक शोषण, जबरदस्ती गर्भपात आणि खासगी फोटोच्या माध्यमातून ब्लॅकमेल केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. याप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> पोहायला जातो सांगून गेले अन् परतलेच नाही... 17 तासानंतर सापडले दोन्ही भावांचे मृतदेह
डेटिंग ॲपवर झाली होती ओळख
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये पीडित महिलेने एका डेटिंग ॲपवर प्रोफाइल तयार केलं होतं. याच ॲपद्वारे तिची ओळख आरोपी तरुणाशी झाली. दोघांमध्ये हळूहळू जवळीक वाढली आणि परस्पर संमतीने त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यावेळी आरोपीने महिलेचे काही खासगी छायाचित्रे काढले.
संबंध ठेवले आणि नंतर गर्भपात करायला भाग पाडलं
महिलेच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारी 2024 मध्ये ती गर्भवती राहिल्यावर आरोपीने तिला जबरदस्तीने गर्भपात करण्यास भाग पाडलं. त्यानंतर आरोपीने तिच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली आणि तिला दुर्लक्षित केलं. काही काळानंतर महिलेला कळलं की, आरोपीची दुसऱ्या मुलीशी साखरपुडा झाला आहे. तेव्हा तिला लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. याबाबत जाब विचारला असता, आरोपीने तिची खासगी छायाचित्रे जाहीर करण्याची धमकी दिली.
हे ही वाचा >> संपत्तीवरुन वाद, सावत्र भावाला संपवलं आणि मृतदेह जंगलात फेकला... पोलिसांनी कसा केला तपास?
दरम्यान, या त्रासाला कंटाळून अखेर 20 जून 2025 रोजी महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांतर्गत जबरदस्ती गर्भपात, फसवणूक आणि गुन्हेगारी धमकी याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सध्या आरोपीला अटक झालेली नाही, मात्र पोलीस या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT
