मानेला बांधले पाय अन्... महिलेची केली भयंकर अवस्था, दारूवरून झाला सगळा राडा

मुंबई तक

30 Jun 2025 (अपडेटेड: 30 Jun 2025, 09:41 PM)

Woman Murder Case Viral News :  कर्नाटकची राजधानी बंगळुरुत एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. शहरातील चिकपेट परिसरात कचरा वाहून नेणाऱ्या गाडीत महिलेचा मृतदेह सापडला.

Woman Shocking Murder Case

Woman Shocking Murder Case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

महिलेच्या हत्या प्रकरणात समोर आला मोठा खुलासा

point

पोलिसांना कचऱ्याच्या गाडीत सापडला महिलेचा मृतदेह

point

पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

Woman Murder Case Viral News :  कर्नाटकची राजधानी बंगळुरुत एक धक्कादायक घटना घडल्याने खळबळ माजली आहे. शहरातील चिकपेट परिसरात कचरा वाहून नेणाऱ्या गाडीत महिलेचा मृतदेह सापडला. मृतदेहाला पोत्यात भरून फेकून देण्यात आलं होतं. त्याचे पाय मानेपासून बांधण्यात आले होते आणि मृतदेह पोत्यात भरला होता. पोलिसांनी या हत्याप्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली.

हे वाचलं का?

महिलेच्या हत्या प्रकरणात समोर आला मोठा खुलासा

आशा (40) असं मृत महिलेचं नाव आहे. तर शमशुद्दीन असं हत्या केलेल्या आरोपीचं नाव आहे. दोघेही मागील अडीच वर्षांपासून विवाहित कपल म्हणून राहत होते. दोघांनीही लग्न केलं होतं. आरोपी आसामचा असून आशा बंगळुरुची रहिवासी होती. दारू पिण्यावरून दोघांमध्येही वादविवाद होत होते. एक दिवस भांडण इतकं वाढलं की, शमसुद्दीनने महिलेची हत्या केली. त्यानंतर शमसुद्दीनने आशाचा मृतदेह त्याच्या कारमध्ये टाकला आणि नंतर बीबीएमपीच्या कचऱ्याच्या गाडीत फेकला. दरम्यान, बंगळुरु पोलिसांनी शमसुद्दीनला अटक केली आहे.

हे ही वाचा >> Hotel Bhagyashree: 'नाद करती काय..' हॉटेल भाग्यश्री आता भलत्याच गोष्टीमुळे चर्चेत!

महिलेचा गळा दाबून केली हत्या

पोलिसांच्या माहितीनुसार, मृत महिला जळवपास 35 वर्षांची होती. मृतदेह पाहिल्यानंतर स्पष्ट झालं होतं की, महिलेची मान आणि हात बांधलेले होते. प्राथमिक तपासात समोर आली की, महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली. त्यानंतर मृतदेह पोत्यात भरून कचऱ्याच्या गाडीत फेकण्यात आला.

हे प्रकरण तेव्हा उघडकीस आलं, जेव्हा BBMP ने सफाई कर्मचारी कचऱ्याची विल्हेवाट लावत होते. तेव्हा त्यांना पोत्यात दुर्गंधी येत असल्याचं समजलं. नंतर त्यांनी तातडीनं पोलिसांना कळवलं. पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना महिलेचा मृतदेह सापडला. घटनास्थळी असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. यामध्ये एक संशयित ऑटो रिक्षा घटनास्थळी जात असल्याचं फुटेज पोलिसांना मिळालं आहे. 

हे ही वाचा >> वारकऱ्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवून लुटलं, चिमुकलीवर बाजूला नेत अत्याचार, दौंडमध्ये संताप