Kalyan Crime: दोन कॉलगर्ल्सना घरी बोलावलं अन गेला जीव; ‘त्या’ रात्री काय घडलं?

मुंबई तक

• 04:02 PM • 12 Jul 2023

कल्याणमधून (Kalyan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पत्नीपासून विभक्त राहणाऱ्या एका 42 वर्षीय व्यक्तीला कॉल गर्लचा (Call Girl) नाद लागला होता. हा नाद इतका लागला होता की दररोज कॉल गर्ल्सना घरी बोलावून त्यांच्यासोबत संबंध ठेवून आपली शारीरीक भुक भागवायचा.

man murder by two call girls with boyfriend kalyan crime story

man murder by two call girls with boyfriend kalyan crime story

follow google news

कल्याणमधून (Kalyan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत पत्नीपासून विभक्त राहणाऱ्या एका 42 वर्षीय व्यक्तीला कॉल गर्लचा (Call Girl) नाद लागला होता. हा नाद इतका लागला होता की दररोज कॉल गर्ल्सना घरी बोलावून त्यांच्यासोबत संबंध ठेवून आपली शारीरीक भुक भागवायचा. मात्र हाच नाद आता त्याच्या जीवावर बेतला आहे. कारण या कॉलगर्ल्सनी आपल्या बॉयफ्रेंडसह मिळून या व्यक्तीची निर्घृण हत्या केली आहे.या घटनेने परीसरात खळबळ माजली आहे. दरम्यान हे संपुर्ण प्रकरण काय आहे, हे जाणून घेऊयात. (man murder by two call girls with boyfriend kalyan crime story)

हे वाचलं का?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मुळचे बीडचे रहिवाशी असलेले व सध्या कल्याणच्या बापगावमधील मल्हार नगर चाळीत 42 वर्षीय मृतक दीपक राहायचे. दीपक हे इंटेरीयरचे काम घेणारे ठेकेदार होते. आणि काही वर्षापुर्वीच ते पत्नीपासून विभक्त झाले होते. त्यामुळे चाळीतल्या खोळीत ते एकटेच राहायचे. त्यातच गेल्या तीन वर्षापासून त्यांची ओळख आरोपी कॉलगर्ल शिवानीशी झाली होती. दीपक कॉलगर्ल शिवानीला घरी बोलावून आपली शारीरिक भूक भागवायचा. कधी कधी तर दीपक दोन कॉलगर्ल्सना बोलावून त्यांच्यासोबत देखील संबंध ठेवायचा. असा त्याचा नेहमीचा कार्यक्रम असायचा. कल्याणमधल्या चाळीतच हा सर्व प्रकार सुरु असायचा.

हे ही वाचा : आईला शेजाऱ्यासोबत पाहिलं नग्नावस्थेत, अन् मुलासोबत घडली थरकाप उडवणारी घटना

या दरम्यान मध्यंतरी शिवानीने दीपकच्या घरी येणे टाळायला सुरुवात केली होती. याचाच जाब विचारण्यासाठी 29 जून 2023 दीपकने शिवानीला कॉल करून शिवीगाळ केली होती. याचाच राग मनात धरून शिवानीने कॉलगर्ल मैत्रिणीसह दोघींच्या बॉयफ्रेंडला घेऊन दीपकच्या हत्येचा आणि लुटीचा कट रचला होता.

ठरल्यानुसार दीपकने कॉलगर्ल शिवानीला आणि तिच्या मैत्रिणीला कॉल करून घरी बोलावले होते. त्यानुसार दोघीही घरी आल्या.यावेळी दोघींनी त्याला पोटभरून दारू पाजली. दीपक पुर्ण नशेत गेल्यानंतर शिवानीने दोघांच्या बॉयफ्रेंडला घटनास्थळी बोलावले. आणि त्यानंतर चौघांनी मिळून धारदार शस्त्राने दीपकची हत्या केली. ही हत्या करून घरातील मौल्यवान वस्तूसह रोकड देखील लांबवली. तसेच पळ काढताना दीपकच्या घराला कडी लावून त्यांनी पळ काढला होता.

दरम्यान दीपकच्या आईने त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला होता. पण दीपक फोन न उचलत असल्याने काळजीपोटी आईने दीपकच्या विभक्त पत्नीला फोन लावला आणि दीपकची काळजी वाटत असल्याने एकदा घरी जाऊन त्याच्या तब्येतीची विचारपासून करण्याची विनंती केली. त्यानुसार पत्नीने मुलीला वडिलांची चौकशी करण्यासाठी घरी पाठवले होते. यावेळी मुलीने घराची कडी उघडताच वडिल रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला होता.तसेच पोलिसांनी हत्येसंबंधी पुरावा शोधण्यासाठी नजीकची सीसीटीव्ही फुटेज आणि दीपकची कॉल डिटेल्स तपासायला सुरुवात केली. दीपकने शेवटचा कॉल हा शिवानीला केला होता. त्यानुसार या नंबरचा शोध घेत आरोपी शिवानीला उल्हासनगरच्या माणेर गावातून पोलीसांनी ताब्यात घेतले. तसेच शिवानीची कसून चौकशी केली असता तिने आरोपी संदीप, देवा आणि भारती असे चौघांनी मिळून दीपकची हत्या केली. यानंतर पोलिसांनी 48 तासात आरोपी संदीप आणि भारतीला ताब्यात घेतले. तर देवा अद्याप फरार आहे. पोलिस सध्या देवाच्या मागावर असून या घटनेचा अधिकचा तपास सुरू आहे.

    follow whatsapp