चार महिलांसोबत केलं लग्न अन् आई-वडिलांची निर्दयीपणे हत्या! ‘त्या’ एका गोष्टीसाठी रचला मोठा कट, नेमकं प्रकरण काय?

एका व्यक्तीने आधी त्याची पत्नी, आई आणि वडिलांचा विमा काढला. नंतर त्याने त्याच्या कुटुंबियांना म्हणजेच ज्यांच्या नावावर विमा आहे, अशा सदस्यांना एक एक करून मारून टाकलं आणि नंतर त्यांचे विम्याचे पैसे लुटले. पण ही घटना लवकरच उघडकीस आली.

‘त्या’ एका गोष्टीसाठी रचला मोठा कट

‘त्या’ एका गोष्टीसाठी रचला मोठा कट

मुंबई तक

• 08:55 PM • 30 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

चार महिलांसोबत केलं लग्न

point

आई-वडिलांची निर्दयीपणे हत्या!

point

‘त्या’ एका गोष्टीसाठी रचला मोठा कट

Crime News: जीवन विमा हा आपल्या आणि आपल्या कुटुंबियांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्याचा एक चांगला मार्ग आहे. जीवनात काही अनपेक्षित घटना घडल्यास या विमा पॉलिसीमुळे आर्थिक मदत मिळते. मात्र, काही लोक या विमा पॉलीसींचा गैरवापर करत असल्याच्या बातम्या समोर येतात. उत्तर प्रदेशातील हापुडमधून एक अशीच बातमी समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आधी त्याची पत्नी, आई आणि वडिलांचा विमा काढला. नंतर त्याने त्याच्या कुटुंबियांना म्हणजेच ज्यांच्या नावावर विमा आहे, अशा सदस्यांना एक एक करून मारून टाकलं आणि नंतर त्यांचे विम्याचे पैसे लुटले. पण ही घटना लवकरच उघडकीस आली.

हे वाचलं का?

खरंतर, पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व विमा कंपन्यांकडून सस्पेक्टेड पॉलिसीच्या डिटेल्स मागवून घेतल्या होत्या. दरम्यान, निवा बुपा हेल्थ इन्श्योरन्स कंपनीचे प्रतिनिधी संजय कुमार यांनी ASP ला माहिती दिली की मेरठ येथील मुकेश चंद सिंघल यांच्याकडे 64 विमा पॉलिसी आहेत. या सर्व पॉलिसी 2018 ते 2023 दरम्यान काढण्यात आल्या होत्या.

याच काळात, विशाल नावाच्या एका तरुणाने 25 जानेवारी 2024 ते 3 फेब्रुवारी 2024 दरम्यान लोनवर टोयोटा लेजेंडर, निसान मॅग्नाइट, ब्रेझा आणि रॉयल एनफील्ड अशा चार गाड्या खरेदी केल्या. शिवाय, मुकेश महिन्याला फक्त 25,000 रुपये कमवत असल्याची माहिती आहे. त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी मुकेशवर संशय व्यक्त केला. पुढील तपासादरम्यान, विशालच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला होता आणि त्याला त्या सर्वांच्या विम्याचे पैसे मिळाले होते, अशी माहिती समोर आली.

चार वेळा लग्न केलं  

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता विशालने चार वेळा लग्न केलं असल्याचं समोर आलं. त्याला त्याच्या पहिल्या पत्नीच्या आणि त्याच्या आईच्या विमा पॉलिसींमधून 1.5 कोटी रुपये मिळाले होते. तसेच, वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला दोन पॉलिसींमधून 50 लाख मिळाले. त्याच्याकडे आणखी 62 पॉलिसींमधून अंदाजे 50 कोटी रुपये होते.

चौथ्या पत्नीने सगळंच सांगितलं  

एका न्यूज एजन्सीने विशालच्या चौथ्या पत्नीशी संवाद साधल्यानंतर तिने बऱ्याच बाबींचा उलगडा केला. ती याबाबत माहिती देताना म्हणाली, "मी मेरठची आहे आणि माझं फेब्रुवारी 2024 मध्ये विशालशी लग्न झालं. आमच्या लग्नानंतर एक-दोन दिवसांतच त्याने बरीच लग्नं केली असल्याचं मला कळलं." तिने पुढे सांगितलं की, आपले वडील 5 ते 7 दिवसांत मरणार असल्याचं विशालने मला सांगितलं. हे ऐकून मला धक्काच बसला, कारण माझ्या सासऱ्यांची तब्येत अगदी ठणठणीत होती. मी नवऱ्याला याबद्दल विचारलं तेव्हा तो विषय टाळू लागला. नंतर, विशालने माझ्या सासऱ्यांना मारून टाकण्यास मदत करण्यासाठी मला जाहीरपणे धमकी दिली. कारण त्याने माझ्या सासऱ्यांच्या नावावर 60 कोटी रुपयांचा विमा काढला होता. मी यासाठी त्याला नकार दिल्यानंतर त्याने मला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने माझ्या नावावर सुद्धा 3 कोटी रुपयांचा विमा काढला होता.”

ती पुढे म्हणाली, "माझ्या सासऱ्यांच्या मृत्यूनंतर, विमा कंपनीचे इन्व्हेस्टिगेटर आमच्या घरी तपासासाठी येऊ लागले. त्यानंतर माझा नवरा मला सुद्धा अशाच प्रकारे मारू शकतो, हे मला जाणवलं. एका रात्री विशालने मला खूप मारहाण केली. पण मी माझ्या वडिलांना आणि भावाला फोन केला. त्यानंतर, मी त्यांच्यासोबत माझ्या आईवडिलांच्या घरी गेले. त्यावेळी, विशालने मला बऱ्याचदा परत बोलवण्याचा प्रयत्न केला आणि मला बरेच आमिष दाखवली. पण मी त्याच्याकडे परत गेले नाही."

हे ही वाचा: ऑनलाइन गेमिंगचा नाद लय बेकार! पाच लाख रुपये गमावून बसला, नंतर कर्ज फेडण्यासाठी रचला ‘तो’ खोटा बनाव...

पोलिसांच्या तपासादरम्यान आलं उघडकीस  

पोलिसांनी विशाल आणि त्याच्या साथीदाराला अटक केल्यानंतर सर्व काही उघडकीस आलं. विशालने यापूर्वी विमा मिळविण्यासाठी खोटे मेडिकल रिपोर्ट्स बनवले होते, ज्यामध्ये त्याने 22 जून 2017 रोजी त्याच्या आईचा अपघातात मृत्यू झाल्याचा दावा केला असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. याच आधारे, आईच्या विमा पॉलिसीतून 25 लाख रुपये विशालला मिळाले. पण खरंतर, विशालने त्याच्या आईची डोक्यात जड वस्तूने वार करून हत्या केली होती.

80 लाख रुपयांचा विमा  

पुढे विशालने पोलिसांना सांगितलं की, "मी 2022 मध्ये माझी पहिली पत्नी एकता सिंघल हिची हत्या केली. माझी एका प्रसिद्ध आणि मोठ्या रुग्णालयात चांगली ओळख होती. मी आवश्यक कागदपत्रे मिळविण्यासाठी त्यांचा वापर केला जेणेकरून मला विम्याचे पैसे सहज मिळू शकतील. यावेळी सुद्धा मी एकताचा आजाराने मृत्यू झाल्याचं भासवून तिच्या विमा पॉलिसीतून 80 लाख रुपये घेतले. मी एकताचा गळा दाबून तिचा खून केला."

हे ही वाचा: 17 वर्षांच्या मुलीला गोळी मारली अन्... नंतर मृतदेह नदीत फेकला! तब्बल 5 दिवसांनंतर... वडिलांनी मुलीसोबत असं का केलं?

62 पॉलिसींचे पैसे येणं बाकी  

आरोपी म्हणाला की, “1 एप्रिल 2025 रोजी मी माझ्या वडिलांना, मुकेश सिंघल यांनाही त्याच पद्धतीनं मारून टाकलं. त्यानंतर, त्यांच्या मृत्यूची तक्रार करून तो अपघाती असल्याचा दावा केला. मुकेशच्या नावावर एकूण 64 पॉलिसी होत्या. त्यांची रक्कम 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. यापैकी दोन पॉलिसींचे पैसे आधीच आले होते आणि इतर पॉलिसींचा तपास सुरू आहे. विशालचा साथीदार सतीश कुमारला सुद्धा पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp