मुलीच्या प्रेमसंबंधाला आईचा विरोध, प्रियकर आणि मित्रांसोबत मिळून काटा काढला अन् आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न...

एका तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या आईची हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आरोपी तरुणीने तिच्या प्रियकर आणि मित्रांसोबत मिळून आपल्या आईला संपवलं

प्रियकर आणि मित्रांसोबत मिळून काटा काढला

प्रियकर आणि मित्रांसोबत मिळून काटा काढला

मुंबई तक

• 11:17 AM • 01 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुलीच्या प्रेमसंबंधाला आईचा विरोध

point

प्रियकर आणि मित्रांसोबत मिळून काटा काढला

point

हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न...

Crime News: एका तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून आपल्या आईची हत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. आरोपी तरुणीने तिच्या प्रियकर आणि मित्रांसोबत मिळून आपल्या आईला संपवलं आणि ती हत्या आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. संबंधित घटना ही बंगळुरूच्या उत्तराहल्ली परिसरात घडली.

हे वाचलं का?

नेमकं प्रकरण काय?   

घटनेतील मृत महिला ही एक लोन रिकव्हरी कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करायची आणि ती तिच्या पतीपासून वेगळी आपल्या मुलीसोबत एकटीच राहायची. पीडित महिलेचं नाव नेत्रावती असल्याची माहिती आहे. पीडितेची मुलगी ही 17 वर्षीय असून 10 वी नापास असून तिचं तिच्या मावशीच्या मुलाच्या मित्रावर प्रेम होतं. मावशीचा मुलाचा मित्र असल्याने तिच्या प्रियकराचं तिच्या घरी सतत येणं-जाणं असायचं. एके दिवशी, नेत्रावतीला तिच्या मुलीच्या अफेअरबद्दल कळलं आणि तिने त्या नात्याला विरोध केला. त्याने तिच्या मुलीच्या प्रियकराला सुद्धा घरात येण्यापासून रोखलं. जर त्याने पुन्हा मुलीशी बोलण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांना बोलावण्याची धमकी सुद्धा तिने दिली.

आईचा काटा काढण्याचा कट 

याच गोष्टीवरून पीडितेची मुलगी आणि तिचा प्रियकर अतिशय संतापले. 24 ऑक्टोबर रोजी संबंधित मुलीने एका मॉलमध्ये तिच्या प्रियकर आणि मित्रांना भेटण्यासाठी बोलवलं. त्यावेळी, आरोपी मुलीने तिच्या आईचा काटा काढण्याचा कट रचला. आपली आई रात्री दारू पिऊन लवकर झोपून जाते, त्यामुळे त्यावेळी घरी जाणं सोपं असल्याचं तिने तिच्या साथीदारांना सांगितलं. 

हे ही वाचा: ठाणे: 'त्या' कारणावरून वाद झाला अन् भाच्याने स्वत:च्या मामालाच संपवलं... CCTV मध्ये घटना कैद

हत्येनंतर, आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न

25 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास, आरोपी तरुणी तिच्या प्रियकर, तीन मित्र आणि 13 वर्षांच्या चुलत भावासोबत घरी पोहोचली. नेत्रावतीने त्यांना सर्वांना पाहिलं आणि रागाच्या भरात तिच्या प्रियकराचा मोबाईल फोन हिसकावून घेतला. तिने पोलिसांना फोन करण्याची धमकी सुद्धा दिली. तेव्हा आरोपींनी त्या महिलेला पकडलं आणि टॉवेलने तिचा गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर, आरोपींनी ती आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी खोलीत जाऊन नेत्रावतीचा मृतदेह पंख्याला लटकवला आणि दरवाजा बंद केला. त्यानंतर, ती मुलगी तिच्या प्रियकरासोबत तिथून पळून गेली. 

हे ही वाचा: राष्ट्रवादी शरद पवारांची तर शिवसेना ठाकरेंची म्हणून ओळखली जाते, मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य; महायुतीत ठिणगी पडणार?

4 अल्पवयीन आरोपींना अटक 

दुसऱ्या दिवशी, नेत्रावतीचा पार्टनर तिच्या घरी गेल्यानंतर घराचा दरवाजा बंद असल्याचं आढळलं. त्यावेळी, ती बाहेर गेल्याचं तिला वाटलं. सोमवारी खिडकीतून पाहिल्यानंतर तिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. यावरून महिलेने आत्महत्या केल्याचा सर्वांनी अंदाज बांधला पण, पीडितेची मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने वेगळाच संशय निर्माण झाला. 29 ऑक्टोबर रोजी मृत महिलेच्या बहिणीने या घटनेसंबंधी पोलिसात तक्रार दाखल केली. चौकशीदरम्यान, आरोपी मुलीने तिचा गुन्हा कबूल केला. पोलिसांनी या प्रकरणी चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. 

    follow whatsapp