पहिली पत्नी सोडून गेली म्हणून दुसरी आणली घरी, पण नवऱ्याच्या मनात भरलेली पहिलीच.. हवी होती 'ती' गोष्ट!

Crime News : आपली पत्नी माहेरी गेल्यानंतर पुन्हा घरी न आल्याने 30 वर्षीय पतीने आत्महत्या केली, एवढंच नाही,तर त्याने नुकतच पाच महिन्यांपूर्वी दुसरा विवाह केला होता.

crime news young man end our life after wife fails to return home from girlhood home

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य: ग्रोक)

मुंबई तक

• 07:33 AM • 01 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

पतीने 'त्या' कारणावरून केली आत्महत्या

point

नेमकं काय घडलं? 

point

पाच महिन्यांपूर्वीच झाला होता दुसरा विवाह 

Crime News : उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातून मन सुन्न करणारा प्रकार उघडकीस आलं आहे. आपली पत्नी माहेरी गेल्यानंतर पुन्हा घरी न आल्याने 30 वर्षीय पतीने गळफास घेत आत्महत्या केली, एवढंच नाही,तर त्याने नुकतच पाच महिन्यांपूर्वी दुसरा विवाह केला होता. हे प्रकरण मंगळवारी उघडकीस आल्याचे सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बारामतीत युपीएससीचा अभ्यास करणाऱ्या तरुणीला उद्योगपतीकडून लग्नाचं आमिष, वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत लैंगिक शोषण 

नेमकं काय घडलं? 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या पतीचं नाव राहुल यादव (वय 30) असे आहे. सोमवारी रात्री उशिरा राहुलने एका झाडाला कपड्याच्या आधारे गळफास घेत आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी कुटुंबीयांना तो लटकलेला आढळला आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

मंगळवारी पोलीस ठाण्याचे प्रभारी संजय शुक्ला यांनी सांगितलं की, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. मृत तरुण राहुल हा सीतापूरमध्ये तैनात असलेल्या पीएसी सैनिक कोमल यादवचा मोठा मुलगा होता. 

हे ही वाचा : लेकाची वडिलांकडे दारूसाठी पैशांची मागणी, पैसे देण्यास नकार, लोखंडी रॉडने जन्मदात्याचा केला खून... नागपूर हादरलं

पाच महिन्यांपूर्वीच झाला होता दुसरा विवाह 

राहुलने दोन विवाह केले होते. त्यापैकी त्याचा पहिला विवाह मोडल्यानंतर त्याने पाच महिन्यांपूर्वी दुसरा विवाह केला होता. राहुलची पत्नी तिच्या पालकांच्या घरी आहे. कुटुंबातील सदस्यांकडून मिळालेल्या एकूण महितीचा हवाला देत त्याने सांगितलं की, राहुलने त्याच्या पत्नीला आपल्या घरी आणू इच्छित होता, परंतु ती येत नव्हती. पत्नीच्या नकारामुळे तो संतप्त झाली आणि त्याने टोकाचं पाऊल उचललं. पोलीस या संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत. 

    follow whatsapp