sexually abused : गाझियाबादमधील मोदीनगर पोलीस ठाणे परिसरातील चुलत भावाने आपल्या 17 वर्षीय चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केला. एवढंच नाही, तर पीडितेला छतावरून फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर बुधवारी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Mumbai: धक्कादायक... मुंबईत मुलांना ओलीस ठेवलेल्या रोहित आर्याचा मृत्यू, पोलिसांनी थेट केला एन्काउंटर
मुलगी छतावर झोपली असता...
मोदीनगरमधील एका गावात एक कुटुंब राहते. पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांची मुलगी 17 वर्षांची असून इंटरमिजिएटची विद्यार्थिनी आहे. 20 ऑक्टोबर रोजी रात्री मुलगी छतावर झोपली असता, रात्री अचानकपणे खाली कोसळली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला स्थानिक रुग्णालयात दाखल केले. तिची सध्या प्रकृती गंभीर झाल्यानंतर विद्यार्थिनीला मेरठ येथे नेण्यात आले.
मुलगा आला आणि...
संबंधित प्रकरणात आल्यानंतर, विद्यार्थिनीने उघड केले की, ती तिच्या घराच्या छतावर झोपली होती. दरम्यान, तिच्या मामाचा मुलगा आला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. तिने अनेकदा प्रतिकारही केला असता, आरोपीन तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि छतावरून फेकूण देण्यात आले आणि तो घटनास्थळावरून पळून गेला.
हे ही वाचा : LIVE: भयंकर.. मुंबईला हादरवणारी घटना! दिवसाढवळ्या स्टुडिओमध्ये 15-20 मुलं ओलीस.. अॅक्टिंग स्टुडिओबाहेर दहशत
विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबियांना सांगितले की, आरोपी आठ वर्षांपूर्वी घराच्या छतावर झोपली होती. पोलिसांनी सांगितलं की, आरोपीने आठ वर्षांपूर्वी लैंगिक शोषण केलं होतं. पोलिसांनी सांगितले की, ते पीडितेची प्रकृती स्थिर कधी होईल याची वाट बघत आहे, यामुळे पीडितेला तिचा जबाब नोंदवता येईल.
ADVERTISEMENT











