Mumbai News : मुंबई सत्र न्यायालयाने एका विवाहित कॉर्पोरेट मॅनेजरला 30 वर्षीय महिलेनं दाखल केलेल्या खटल्यातून निर्दोष मुक्त केलंय. आरोपीने लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्याशी 13 वर्षे नातेसंबंध ठेवले आणि नंतर तिचा तीन वेळा गर्भपात केल्याचा धक्कादायक आरोप तिने केला आहे. न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं की, हे नातेसंबंध हे दोघांच्याही संमतीने झाले होते. महिला ही सुशिक्षित होती, तिला आरोपीच्या विवाहित असण्यासह त्याची इतर संपूर्ण परिस्थितीची जाणीव देखील होती. न्यायालयाने म्हटलं की, आरोपीने तिच्याशी विवाह न केल्याने महिलेनं रागाच्या भरातच एफआरआय दाखल केला होता.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : तरुणाने महिला पोलीस कॉन्स्टेबलला पाठवले अश्लील फोटो, आरोपीवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
नेमकं प्रकरण काय?
न्यायाधीश एस. एस. आडकरांनी सांगितलं की, जेव्हा संबंध सुरु झाले होते तेव्हा त्या महिलेचं वय हे सुमारे 30 वर्षे होते. ती एक प्रौढ महिला होती आणि तिच्यासोबत सुरु असलेल्या सर्व गोष्टींची तिला जाणीव देखील झाली होती, त्यामुळे महिलेची फसवणूक झाली असं म्हणता येणार नाही. न्यायाधीशांनी असेही स्पष्ट केले की, जर तिला खोटी माहिती दिली असती तर, तिने तिला ताबडतोब पोलीसात तक्रार करायला हवी होती, पण तिने तक्रार दाखल केली नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या अशाच काही निर्णयांचा दाखला देताना न्यायाधीशांनी निष्कर्ष काढला की, लग्नाच्या खोट्या आश्वासनाखाली आणि फसवणूक सिद्ध करण्यासाठी कसलीही जबरदस्ती करणे गरजेचं नाही. याच प्रकरणात न्यायाधीश पुढे म्हणाले की, वरील बाब लक्षात घेता, या प्रकरणातील दोघांचे शरीरसंबंध संमतीचेच होते. पीडितेला कोणत्याही प्रकारे जबरदस्ती, दिशाभूल किंवा चुकीची माहिती देण्यात आली नव्हती. तिने जे काही केलं ते तिने स्वत:च्या मर्जीनेच केलं आहे.
माटुंगा पोलीस ठाण्यात 2014 मध्ये दाखल झालेल्या एफआयआरने या प्रकरणाची सुरुवात झाली. महिलेच्या तक्रारीनुसार, ही घटना 2000 ते 2013 दरम्यान घडल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित प्रकरणात सरकारी वकिलांनी असा युक्तीवाद केला की, आरोपी ज्या कंपनीत काम करत होती, तिथेच आरोपी हा मॅनेजर म्हणून कार्यरत होता. आरोपीने आजारी असल्याचे भासवून महिलेला त्याच्या घरी नेले आणि नंतर तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास सुरुवात केली. नंतर त्याने आपलं महिलेवर प्रेम असल्याचं सांगितलं होतं. त्याने लग्नाचं देखील आश्वासन दिलं आणि तिच्यावर लैंगिक शोषण केलं.
महिला तीन वेळा गर्भवती
आरोपीने तिला 2001, 2010 आणि 2012 मध्ये महिला तीन वेळा गर्भवती राहिली होती, असे पुरावे सरकारी वकिलांनी सादर केले होते. आरोपीच्या आग्रहावरून तिने तिन्ही वेळा गर्भपात केल्याचं सांगितलं जातंय. जेव्हा आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता, तेव्हा त्यांचे संबंध बिघडले. 2013 मध्ये आरोपीने महिलेला धमकी देखील देण्यात आली.
सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर सात साक्षीदारांची तपासणी करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायाधीशांनी असा निर्णय दिला की, सरकारी वकिलांना त्यांचा खटला देखील सिद्ध करण्यास अपयश आलं. त्यांनी आरोपीच्या विवाहाच्या जीवनाबाबत तफावता असल्याचे निदर्शनात आणून देण्यास सांगितली होती.
तिने कबूल केलं की, 2001-02 मध्ये आरोपीच्या पत्नीला भेटली होती. याचा अर्थ असा की, जेव्हा तिने पहिल्यांदा आरोपीशी लैंगिक संबंध ठेवले तेव्हा तिला आरोपी हा विवाहित असल्याची पूर्णपणे कल्पना देखील होती. याच प्रकरणात न्यायाधीशांनी स्पष्ट केलं की, महिलेनं केवळ संबंध चालू ठेवलेच नाहीतर आरोपीच्या मुलाच्या जन्मानंतर कंपनीत मिठाई देखील वाटली होती, हे मान्य केलं होतं.
हे ही वाचा : पुण्यात भीषण अपघात, ई-बसने गर्भवती महिलेला दिली धडक, तर 9 वर्षीय सख्ख्या बहिणीचा दुर्दैवी अंत
या प्रकरणात, न्यायालयाने स्पष्ट केलं की, महिलेला लग्नाचं आमिष दाखवून पुरुषाशी लैंगिक संबंध ठेवणे ही फसवणूक नाही, तसेच जर संबंध सहमतीने असतील तर पीडितेला परिस्थितीची पूर्णपणे जाणी असेल, महिलेनं जर स्वत:च्या मर्जीने संबंध ठेवल्याने आरोपीची निर्दोषणे सुटका करण्यात आली होती.
ADVERTISEMENT











