मुंबई : पत्नी आणि मुलांच्या मृतदेहासोबत घालवले 24 तास! नेव्ही ऑफिसरने आत्महत्येआधी काय केलं?

मुंबई तक

• 11:35 AM • 19 Aug 2026

मुंबईत एका नेव्ही ऑफिसरने बायको अन् मुलांची हत्या करुन आत्महत्या केली होती. याप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा कोल्ड ब्लडेड मर्डर आहे. तसेच बायको अन् मुलांची हत्या करुन नेव्ही ऑफिसरने त्यांच्या मृतदेहासोबत 24 तास घालवले असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Indian Navy Officer Death

Indian Navy Officer Death

Google CTA

बातम्या हायलाइट

point

पत्नी आणि मुलांच्या मृतदेहासोबत घालवले 24 तास!

point

नेव्ही ऑफिसरने आत्महत्येआधी काय केलं?

Indian Navy Officer Death: मुंबईतील कफ परेड परिसरातील नेव्ही नगरमध्ये एका नेव्ही ऑफिसरसह त्याची बायको आणि मुलांचा मृतदेह राहत्या घरात आढळून आला होता. बायको आणि दोन मुलांचे मृतदेह बेडवर आढळून आले, तर नेव्ही ऑफिसरचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे नेव्ही ऑफिसरने आधी बायको आणि मुलांची हत्या केली अन् नंतर स्वत: आत्महत्या केली असा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र ही घटना म्हणजे कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त  केला आहे. तसेच बायको आणि मुलांची हत्या करुन त्यांच्या मृतदेहांसोबत नेव्ही ऑफिसर 24 तास राहिला असावा अशीही शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

नेव्ही ऑफिसरसह चौघांचा मृत्यू

शनिवारी (15 ऑगस्ट) कफ परेड परिसरातील नेव्ही नगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले होते. नेव्ही ऑफिसर पूरनमल मेहरा (वय 30), त्याची बायको ओमा (वय 28), मुलगा यश (वय 3) आणि दीड महिन्यांची लेक अशा चौघांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. गेल्या चार दिवसांपासून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असा प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात होता. या प्रकरणात इंडियन नेव्हीनेही तपासात सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते. अखेर पोलिसांनी ही घटना नेमकी कशी घडली असावी याचा उलगडा केला आहे.

हे ही वाचा : ठाकरेंच्या केसमध्ये मोठा ट्वीस्ट? सुप्रीम कोर्ट स्वतःचाच निकाल बदलणार?

येऊन आमचे मृतदेह घेऊन जा'

14 ऑगस्टच्या रात्री पूरनमल यांनी त्यांच्या वडिलांच्या मोबाईलवर एक मेसेज केला होता. 'येऊन आमचे मृतदेह घेऊन जा' (आके हमारी डेड बॉडी लेके जाना) असा तो मेसेज होता. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मेसेज करण्यापूर्वी पूरनमल यांनी बायको आणि मुलांची हत्या केली. त्यानंतर तब्बल 24 तास त्यांनी या मृतदेहांसोबत घालवले आणि नंतर आत्महत्या केली. या चोवीस तासात पूरनमल यांनी नक्की काय केलं याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

हे ही वाचा : ग्राऊंड रिपोर्ट : 'भैय्या लोकं हट्टी आहेत, त्यांनी मराठी बोलावं नाहीतर निघून जावं'

'त्या' चोवीस तासात काय केलं?

आत्महत्या करण्यापूर्वी पूरनमल यांनी तिघांची हत्या करुन आधी घर धुवून, नीटनेटके करुन घेतले. कचऱ्याचा डबा स्वच्छ केला आणि मोबाईलमधील सगळा डेटा डिलिट केला. यामुळे हा एक कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याचा पोलिसांना संशय आहे. 15 ऑगस्ट रोजी पूरनमल यांच्या आईने मेसेज बघितला आणि घटना उघडकीस आली. पोलीस घरी पोहोचले तेव्हा बायको आणि मुलांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात झाली होती, तर पूरनमल यांचा मृतदेह कुजण्याची प्रक्रिया सुरु झाली नव्हती. यावरुन त्यांच्या मृत्यूमध्ये चोवीस तासाचं अंतर असल्याचं बोललं जात आहे. या प्रकरणी पूरनमल यांच्या भावाचा जबाब घेण्यात आला असून त्यांच्या पत्नीच्या कुटुंबियांचाही जबाब नोंदवला जाणार आहे. सध्या मृतदेहांचे शवविच्छेदन सुरु असून अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.