दाजीसोबत पळाली विवाहित मेहुणी, सात महिन्यांनी परतली अन् घडलं भयंकर

मुंबई तक

• 10:35 AM • 18 Aug 2026

मध्य प्रदेशातील येथे मेहुण्याच्या खून प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मेहुण्याने एका अल्पवयीन मुलासोबत मिळून आपल्या मेहुणीसोबतच्या कथित प्रेमसंबंधातून हा गुन्हा केला. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

दाजीसोबत पळाली विवाहित मेहुणी,

point

सात महिन्यांनी परतली अन् घडलं भयंकर

Crime News : नात्याला काळीमा फासणारी एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली असून यामागे दुसरा तिसरा  कोणी नसून मृताचा साडू असल्याचे समोर आले आहे. या हत्येमागे मेहुणीसोबत अनैतिक संबंधांचे कारण असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, या भयानक घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

मेहुण्यासोबत घरातून पळाली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची पत्नी आणि आरोपी वीरेंद्र यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. साधारण सात महिन्यांपूर्वी ही महिला आरोपी वीरेंद्रसोबत घरातून निघून गेली होती. मात्र, काही काळानंतर आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून ती पुन्हा पतीच्या घरी परतली. महिला पुन्हा पतीकडे गेल्याने वीरेंद्रच्या मनात प्रचंड राग खदखदत होता आणि याच रागातून त्याने या हत्येचा कट रचला.

हे ही वाचा : खड्ड्यांचं रिपोर्टिंग करणाऱ्या व्हायरल मुलींना राज ठाकरेंनी काय सांगितलं?

कशी केली हत्या?

हत्येचा कट अंमलात आणण्यासाठी आरोपीने मृताला त्याची सोन्याची साखळी आणि मंगळसूत्र परत मिळवून देण्याच्या बहाण्याने एनटीपीसी (NTPC) परिसरात बोलावून घेतले. तेथून वीरेंद्रने त्याला आपल्या दुचाकीवर बसवून एका निर्जन ठिकाणी नेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यानंतर वीरेंद्रने एका अल्पवयीन साथीदाराच्या मदतीने या तरुणावर चाकूने सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला, तर आरोपी तो चाकू तरुणाच्या पोटातच खुपसलेला सोडून घटनास्थळावरून फरार झाले.

हे ही वाचा : गाडीला कट मारल्याचा वाद, रीलस्टारवर पुण्याच्या कॅफेत कोयत्याने वार

नातेवाईकांचा संताप

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या धक्कादायक घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांमध्ये संताप उसळला होता आणि त्यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. नरसिंगपूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ASP) संदीप भुरिया यांनी सांगितले की, पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने छडा लावत मुख्य आरोपी वीरेंद्र आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.