Crime News : मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यातून मन सुन्न करून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका सहा वर्षाच्या मुलीच्या आईने आणि तिच्या प्रियकराने मिळून हत्या केली. या प्रकरणात महिला आणि तिच्या बॉयफ्रेंडला पोलिसांनी अटक केली. दोघांनी आपले प्रेमसंबंध लपवून ठेवण्यासाठी आणि समाजात बदनामी होण्याच्या भीतीने लहान बाळाला संपवले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : सूर्यदेव वर्षानंतर आपल्या राशीत जाणार, 'या' राशींचे नशीब पालटणार
विहिरीत सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह
गावातील एका विहिरीत सहा वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळून आला होता. मुलीचा मृतदेह ओळखण्यासाठी पोलिसांना एक मोठे आव्हान तयार झाले होते. फॉरेन्सिक तपास आणि डायटम टेस्ट रिपोर्टसह न्यायवैद्यक पुराव्याच्या आधारे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. तपासादरम्यान, पोलिसांना आरोपीबाबत महत्त्वाचे धागेदोरे सापडले.
पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, दोन्ही आरोपींनी तपास टाळण्यासाठी त्यांचे वैयक्तिक मोबाईल फोन वापरणे टाळले आणि त्याऐवजी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांच्या मोबाईल फोनवरून एकमेकांशी संपर्क साधला होता. संबंधित प्रकरणात सायबर सेलने तांत्रिक पुरावे, टॉवरची ठिकाणे आणि इतर माहितीचे विश्लेषण करून आरोपीचा शोध घेतला.
महिलेचे पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध
एका सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी 15 ऑगस्ट रोजी ग्वाल्हेरमध्ये दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान दोन्ही आरोपींना गुन्ह्यातील आपली भूमिका केली. संबंधित महिलेनं तिच्या पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध होते.
हे ही वाचा : सिंहगडावर राडा, धक्का लागला म्हणून हाणामारी.. हादरवून टाकणारा VIDEO
पोलिसांच्या तपासातून माहिती समोर आली, पीडित मुलगी हा आपल्या आजोबांच्या घरी जाण्याच्या प्रयत्नांत होता. आरोपींना भीती होती की, जर मुलगी तिच्या आजोबांच्या घरी गेली असता, त्यांच्या नातेसंबंधाबाबत माहिती उघड झाली. याच भीतीने मुलीला रात्री एका विहिरीजवळ बोलावून हत्येचा कट रचला. या घटनेदरम्यान आईने मुलीचे हात धरले आणि तिच्या प्रियकराने गळा दाबला. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्यासाठी नंतर मृतदेह विहिरीत फेकून देण्यात आला. संबंधित प्रकरणात महिला आणि त्याच्या प्रियकरावर गुन्हे दाखल करण्यात आले. या अज्ञात हत्या प्रकरणाचा जलदगतीने छडा लावण्यात आला होता.
ADVERTISEMENT












