सिंहगडावर राडा, धक्का लागला म्हणून हाणामारी.. हादरवून टाकणारा VIDEO

मुंबई तक

17 Aug 2026 (अपडेटेड: 17 Aug 2026, 11:25 AM)

Sinhagad Fort Viral Video : पुण्यातील सिंहगडावर रविवारी तरुणांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली. धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादानंतर लाठ्या-काठ्या, दगड आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.

Sinhagad Fort Viral Video

Sinhagad Fort Viral Video

Google CTA

बातम्या हायलाइट

point

सिंहगडावर राडा, धक्का लागला म्हणून हाणामारी..

point

हादरवून टाकणारा VIDEO

Sinhagad Fort Viral Video : पुण्यातील सिंहगडावर तरुणांच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सिंहगडावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. याच गर्दीत धक्का लागल्याच्या कारणावरून काही तरुणांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला झालेला हा वाद काही वेळातच वाढला आणि तरुणांच्या दोन गटांमध्ये मारामारी सुरू झाली.

हे वाचलं का?

हेही वाचा : 4 राज्ये, 250 सीसीटीव्ही अन् 7 हजार किमीचा पाठलाग...गर्लफ्रेंडला संपवणाऱ्या तरुणाला कसं पकडलं?

दोन गटात तुफान हाणामारी, सिंहगडावर काय घडलं? 

वाद वाढल्यानंतर सिंहगडावरच तरुणांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या हाणामारीत लाठ्या-काठ्या, दगड तसेच लाथा-बुक्क्यांचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही काळ सिंहगडावरील वातावरणात तणाव निर्माण झाला. तरुणांच्या दोन गटांमध्ये झालेल्या या हाणामारीचा प्रकार उपस्थितांच्या निदर्शनास आला.

हेही वाचा : 'हा माझा मुलगा नाही...' चिमुकल्याला खांबावर आपटून मारले, नराधम बापाचं कृत्य

मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल 

या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तरुणांचे दोन गट एकमेकांना मारहाण करताना दिसत असल्याचे समोर आले आहे. सिंहगडासारख्या पर्यटनस्थळी झालेल्या या प्रकारामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. धक्का लागल्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याने या प्रकरणातील संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आता केली जात आहे.