lakhimpur kheri gang rape case : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरीमध्ये 15 ऑगस्ट रोजी एका तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. सीतापूर येथे राहणारी पीडिता लखीमपूरमध्ये आपल्या आजीकडे आली होती. तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ श्रीवास्तव याने वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला आपल्या घरी बोलावले होते. त्याच्या घरी सिद्धार्थचे दोन मित्र मधुरेश मिश्रा आणि विष्णू कनौजिया हे देखील उपस्थित होते. तिघांनी आधी केक कापून वाढदिवस साजरा केला. त्यानंतर तिघांनी मिळून तरुणीवर बारी-बारीने बलात्कार केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : दोन बॉयफ्रेंड, तरुणी झाली प्रेग्नंट, बाळाचा बाप कोण? DNA चाचणीतून होणार खुलासा
केक कापल्यानंतर तिघांनी केला तरुणीवर बलात्कार
केक कापल्यानंतर तिघांनी तरुणीला खोलीत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. घटनेनंतर आरोपींनी तरुणीला जखमी अवस्थेत खोलीत सोडून घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर तरुणीने आरडाओरड केली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
हेही वाचा : महिलेचे पतीच्या मित्रासोबत अनैतिक संबंध, सहा वर्षांच्या लेकराला संपवलं
तिन्ही आरोपींना 24 तासांच्या आत अटक
माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पीडितेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तसेच प्रकरणाची नोंद करून आरोपींच्या शोधासाठी अनेक पथके तैनात करण्यात आली. लखीमपूरमधील पोलीस अधिकारी विवेक तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ऑगस्ट रोजी सदर कोतवाली पोलीस ठाण्यात तीन युवकांनी बलात्कार केल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार केले आणि प्रकरण दाखल केले.
या प्रकरणातील नामनिर्देशित आरोपी सिद्धार्थ श्रीवास्तव, मधुरेश मिश्रा आणि विष्णू कनौजिया यांना पोलिसांनी 16 ऑगस्टच्या रात्री अटक केली. म्हणजेच घटनेनंतर 24 तासांच्या आत तिघांनाही अटक करण्यात आली. या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच घटनास्थळी शांतता आणि सुव्यवस्था कायम असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT












