Crime News : एका बंद खोलीत महिला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. तिच्या दोन लहान मुली घरातच पलंगावर मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. ही हत्या आहे की आत्महत्या याचा शोध सुरू ठेवण्यात आलाय. ही घटना बिहारच्या नवादा येथील आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. मृत महिलेची निदा खातून (वय 32) अशी ओळख समोर आली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : प्रायव्हेट पार्ट विकून 1.20 कोटी रूपये मिळणार, रील पाहून आरोपीने मुलाचे गुप्तांग कापलं
मृत्यूमागील संबंध हत्येशी लावण्यात आला का?
पोलिसांनी सांगितलं की, ज्या परिस्थितीत मृतदेह आढळून आला तेव्हा ही परिस्थिती संशयास्पद असून मृत्यूमागील संबंध हत्येशी लावण्यात आला का? असा प्रश्न उपस्थित होतोय. हा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. तिच्या शरीराचे काही भाग पलंगाला स्पर्श करत असल्याचे आढळून आल्याने तिची हत्या करून नंतर मृतदेह लटकवण्यात आल्याचा संशय अधिक आहे.
दोन मुलं पलंगावर मृतावस्थेत
घराच्या वरील मजल्यावरील खोलीत दरवाजा बराच वेळ बंद असल्याचे कुटुंबातील सदस्यांच्या लक्षात आले होते. आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता, त्यांना दोन मुलं पलंगावर मृतावस्थेत स्वरुपात पडलेली आणि निदा फासाला लटकलेल्या स्वरुपात आढळून आली.
हे ही वाचा : Astrology : 'द्विद्वादश राजयोग' निर्मितीमुळे 'या' राशींचे नशीब चमकण्याची शक्यता
दोन मुलांचा गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचा संशय आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप मृत्यूच्या नेमक्या कारणाची पुष्ट अद्याप केलेली नाहीये. शवविच्छेदनानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. संबंधित प्रकरणात आरोपींनी मृतदेह ताब्यात घेतले. नंतर घटनास्थळी न्यायवैद्यक तपासणीनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याच आला.
ADVERTISEMENT












