प्रेयसीने स्वत:ला संपवलं, दारूच्या नशेत प्रियकरानेही चितेत... नागपूरमधील धक्कादायक घटना

मुंबई तक

10 Jun 2025 (अपडेटेड: 10 Jun 2025, 09:26 AM)

Nagpur : न्यू कांपती पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेश्रामच्या प्रेयसीने प्रेमसंबंधांमुळे नैराश्यात येऊन आत्महत्या केली होती. तिचे अंत्यसंस्कार शांती घाटावर सुरू असताना मेश्राम तिथे पोहोचला.

Mumbai Tak
Google CTA

Nagpur Crime News : प्रेमात लोक काहीही करायला तयार असतात. अशीच एक घटना नागपूरमध्ये घडली. नागपूरमधील शांती घाटावर एका तरूणीचे अंत्यसंस्कार सुरू होते. त्यावेळी एका 27 वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीच्या जळत्या चितेत उडी मारण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (9 जून 2025) संध्याकाळी 4 वाजता कन्हान नदीच्या किनारी घडली. नशेत धुंद असलेल्या अनुराग राजेंद्र मेश्राम या तरुणाला अंतिम संस्कारासाठी उपस्थित जमावाने चितेत पडण्यापासून रोखलं. मात्र त्यानंतर त्याला बेदम मारहाण केली, ज्यामुळे तो तरूण गंभीर जखमी झाला.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> पुण्यात डिजिटल अरेस्ट स्कॅमचा कहर; पाच महिन्यांत 9.21 कोटींची फसवणूक, 'हे' लोक टार्गेट

न्यू कांपती पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेश्रामच्या प्रेयसीने प्रेमसंबंधांमुळे नैराश्यात येऊन आत्महत्या केली होती. तिचे अंत्यसंस्कार शांती घाटावर सुरू असताना मेश्राम तिथे पोहोचला. त्याने नशेच्या धुंदीतच चितेत उडी मारण्याचा प्रयत्न केला. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने त्याला मारहाण केली.

हे ही वाचा >> काय होता राजा-सोनमचा हनिमून प्लॅन? सोनमच्या सासूनं केला धक्कादायक खुलासा, "शिलाँगचं तिकीट.."
​​​​​

पोलिसांनी सांगितलं की, मेश्रामच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर आणि तो जबाब देण्यास सक्षम झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध पुढील कारवाई केली जाईल. 

दरम्यान, सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शींची माहिती गोळा करत आहेत. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.