पुण्यात डिजिटल अरेस्ट स्कॅमचा कहर; पाच महिन्यांत 9.21 कोटींची फसवणूक, 'हे' लोक टार्गेट

ओमकार वाबळे

या स्कॅममध्ये सायबर गुन्हेगार स्वतःला सीबीआय, पोलिस किंवा अन्य सरकारी यंत्रणांचे अधिकारी म्हणवून घेत व्हिडिओ कॉल करतात. फोनद्वारे संपर्क साधत ते लोकांना सांगतात की, "तुमच्यावर मनी लाँड्रिंग, सिम कार्डचा गैरवापर किंवा अन्य गुन्ह्यांचा आरोप आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Pune Crime News : पुण्यात सायबर गुन्हेगारांनी पुन्हा एकदा सुरक्षा यंत्रणांना आव्हान दिलं आहे. जानेवारी 2025 ते मे 2025 या 5 महिन्यात 'डिजिटल अरेस्ट स्कॅम'चे 21 प्रकरणं समोर आले असून, यात तब्बल 9.21 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. या गंभीर परिस्थितीला तोंड देण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष सायबर पथक स्थापन केलं आहे. विशेष म्हणजे, आयटी प्रोफेशनल्स, अभियंते, प्राध्यापक आणि शिक्षकांसारखे सुशिक्षित लोक या फसवणुकीला बळी पडत आहेत.

'डिजिटल अरेस्ट' स्कॅम म्हणजे काय?

या स्कॅममध्ये सायबर गुन्हेगार स्वतःला सीबीआय, पोलिस किंवा अन्य सरकारी यंत्रणांचे अधिकारी म्हणवून घेत व्हिडिओ कॉल केले. फोनद्वारे संपर्क साधत ते लोकांना सांगतात की, "तुमच्यावर मनी लाँड्रिंग, सिम कार्डचा गैरवापर किंवा अन्य गुन्ह्यांचा आरोप आहे. तुमच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी झालं आहे." भीती आणि गोंधळाच्या परिस्थितीत पीडित घाबरून गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. त्यानंतर त्यांना पैसे ट्रान्सफर करण्यास  भाग पाडले जाते.

हे ही वाचा >> मुंबईत 'या' भागात होणार विजांचा कडकडाट! कोणत्या ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस? ठाण्यातही वादळी वारे..


हाय-प्रोफाइल फसवणुकीचे प्रकरण

मुंबईतील एका व्यापाऱ्याला 6.3 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं मोठं प्रकरण समोर आलं आहे. सायबर गुन्हेगारांनी स्वतःला सीबीआय अधिकारी म्हणवून व्यापाऱ्याला डिजिटल अरेस्ट केले आणि बनावट मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकवले. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी 28 वर्षीय तुषार हरीशचंद्र वजानत्री याला अटक केली. तो फसवणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या म्यूल अकाउंटचा संचालक होता. विशेष म्हणजे, त्याची पत्नी त्या गावची निवडून आलेली सरपंच आहे.

पोलिसांचा प्रतिसाद आणि उपाययोजना

हे ही वाचा >> काय होता राजा-सोनमचा हनिमून प्लॅन? सोनमच्या सासूनं केला धक्कादायक खुलासा, "शिलाँगचं तिकीट.."

पुणे पोलिसांनी नागरिकांना जागरूक करण्यासाठी 1930 ही सायबर हेल्पलाइन सुरू केली आहे.24×7 ही हेल्पलाईन कार्यरत आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी सांगितलं की, सायबर गुन्ह्यातील पहिले काही तास (गोल्डन अवर्स) अत्यंत महत्त्वाचे असतात. पोलीस अधिकाऱ्यांना आता विशेष तांत्रिक प्रशिक्षण दिलं जाणार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp