Nagpur Crime News : नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये एका धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. एका 25 वर्षीय तरुणाने घरगुती वादातून आपल्या 49 वर्षीय आईची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव मुकेश मरस्कोले आहे, तर मृत महिलेचं नाव प्रमिला मरस्कोले असं आहे.
ADVERTISEMENT
वाद झाला आणि चाकूने आईलाच भोसकलं...
शुक्रवारी रात्री सावनेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. आई आणि मुलगा इथे एकत्रच राहत होते. मिळालेल्या माहितीनुसार, आई-मुलामध्ये कौटुंबिक कारणांवरून बऱ्याच काळापासून तणाव होता. शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा त्यांच्यात वाद झाला, जो हळूहळू गंभीर स्वरूप धारण करत गेला. याच वादाच्या रागातून मुकेशने स्वयंपाकघरातून धारदार शस्त्र घेऊन आपल्या आईवर अनेक वार केले. या हल्ल्यात प्रमिलाचा जागीच मृत्यू झाला.
राजा-सोनम हनिमून प्रकरणात मोठी अपडेट! जंगलात सापडला मोठा पुरावा..पोलिसांना CCTV फुटेजमध्ये..
घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी अवघ्या चार तासांत आरोपी मुकेशला अटक केली. शनिवारी त्याला न्यायालयात हजर केलं असता, 9 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
मुलगा आणि आईमध्ये नेहमीच खटके उडायचे, पण...
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात आरोपी मानसिकदृष्ट्या अस्थिर नसल्याचं स्पष्ट झालं आहे. घरगुती तणाव आणि रागाच्या भरातच त्याने हे कृत्य केल्याचं दिसतंय. स्थानिक लोकांनी सांगितलं की, आई-मुलामध्ये नेहमीच खटके उडायचे, एवढी हिंसक घटना घडेल, याचा कुणी विचारही नव्हता केला.
हे ही वाचा >> रुममध्ये पाच-पाच बायकांसोबत रोमान्स करायचा..पठ्ठ्या तरीही खुश नाही झाला, नंतर घेतला भलताच निर्णय!
सध्या पोलिसांनी हत्येसाठी वापरलेलं शस्त्र जप्त केलं असून, आरोपीची अधिक चौकशी सुरू आहे. हत्येमागील नेमक्या परिस्थितीचा तपास करण्यासाठी पोलीस गहनतेने तपास करत आहेत. ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली असून, यामुळे स्थानिकांमध्येही भीतीचं वातावरण आहे.
ADVERTISEMENT
