CCTV: 'बायकोची बदनामी करतो..', संतापलेल्या नवऱ्याचे डॉक्टरवर कोयत्याचे 18 वार; नाशिक हादरलं

नाशिकमधील एका रुग्णालयात एका महिलेने लाखो रुपयांचा गैरवापर केला, त्यामुळे पत्नीची बदनामी केल्याचा आरोप करत त्या महिलेच्या नवऱ्याने डॉक्टरवर कोयत्याने सलग 18 वार केले, त्यामध्ये डॉक्टर गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Nashik doctor attack

Nashik doctor attack

मुंबई तक

26 Feb 2024 (अपडेटेड: 26 Feb 2024, 04:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

हॉस्पिटलमध्येच डॉक्टरवर कोयत्याचे 18 वार

point

पत्नीची बदनामी केली म्हणून डॉक्टरवर कोयत्याचे सलग 18 वार

Nashik Crime : नाशिकमध्ये मोठी खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने हॉस्पिटलच्या डॉक्टरवर एकामागून एक असे 18 वेळा कोयत्याने वार (Attack) केले आहेत. कोयत्याच्या हल्ल्यामुळे डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली आहे. कोयत्याच्या हल्ल्यामुळे डॉक्टरांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. ही भयंकर घटना हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्याचे फुटेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Video Viral) झाले आहे. 

हे वाचलं का?

रुग्णालयात येऊन हल्लेखोराने तलावारीने वार केलेल्या डॉक्टरचे नाव कैलास राठी आहे. ते नाशिकमधील पंचवटीतील सुयोग हॉस्पिटलचे संचालक आहेत. 

पत्नीची बदनामी

डॉ. कैलास राठी यांच्यावर हल्ला करण्यात आल्यानंतर पोलिसही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पत्नीची बदनामी केल्याच्या कारणातून हा हल्ला केल्याची कबूली हल्लेखोराने दिली आहे. 

या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, 'ज्या हल्लेखोराने डॉक्टराने कोयत्याने वार केले आहेत, त्याच्या पत्नीची बदनामी केल्याच्या कारणावरून त्याने हा हल्ला केला आहे. हल्लेखोराच्या पत्नीने हॉस्पिटलमध्ये 6 लाखांचा गैरवापर केला होता. 

लाखो रुपयांचा गैरवापर 

पैशांच्या गैरवापरामुळे तिला कामावरून काढून टाकण्यात आले होते. मात्र त्यानंतरही तिला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आले होते. तरीही त्याच्या पत्नीने नंतर पुन्हा 12 लाख रुपये घेऊन पुन्हा ते परत केलेच नाहीत.'

डॉ. कैलास राठी हे शुक्रवारी रात्री हॉस्पिटलमध्ये होते, त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी एक व्यक्ती आली होती. त्यावेळी ते दोघंही डॉक्टरांच्या ऑफिसमध्ये गेले.

कोयत्याचे 18 वार

त्यानंतर ऑफिसमध्येच त्यांच्यामध्ये वाद सुरु झाले आणि त्या व्यक्तीने आणलेल्या कोयत्याने त्यांच्यावर थेट 18 वेळा वार केले. कोयत्याचे वार डोक्यावर आणि मानेवर झाल्याने डॉक्टर गंभीर जखमी झाले आहेत.  

हा हल्ला झाल्यानंतर पेशंट आणि डॉक्टर असा वाद झाल्याची चर्चा होती. मात्र हा वाद पेशंट-डॉक्टरचा नसून आर्थिक देवाण-घेवाण आणि बदनामीच्या कारणावरून झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

    follow whatsapp