Nashik Crime News : तरुणीने तिच्या गर्लफ्रेंडसोबत विवाह केलेला असताना आई-वडिलांच्या दबावामुळे नाशकातील एका तरुणाशी विवाह करुन त्याची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. याप्रकरणी समलिंग विवाहानंतर तरुणाची फसवणूक करणाऱ्या तरुणीसह तिच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिक रोड पोलिसांनी या प्रकरणात कारवाई केली आहे.
ADVERTISEMENT
अंगाला हात लावला तर आत्महत्या करेन, तरुणीची पतीला धमकी
अधिकची माहिती अशी की, तरुणीने तिच्या गर्लफ्रेंडशी विवाह केला होता. त्यानंतर आई-वडिलांकडून तरुणीवर तिच्या समलिंगी विवाहाला विरोध करण्यात येत होता. त्यामुळे समलिंगी विवाहानंतर देखील तरुणीने नाशकातील एका मुलासोबत लगीनगाठ बांधून त्याची फसवणूक केली. मात्र, लग्नाच्या काही दिवसांनंतर मुलाला तरुणीचं वेगळेपणा जाणवू लागला. माझ्या अंगाला हात लावल्यास आत्महत्या करेन, अशी धमकी मला मुलीकडून देण्यात आली असल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. तरुणाने पत्नीचा मोबाईल तपासल्यानंतर त्याला अश्लील व्हिडीओ दिसले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने पत्नीच्या वडिलांना माझी फसवणूक का केली? याचा जाब विचारला. मात्र, त्यांच्याकडून तरुणालाच शिवीगाळ करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास नाशिक पोलिसांकडून सुरु आहे.
हेही वाचा : पुणे हादरलं! कोंढव्यात पैशांवरून वाद, घरात घुसून वडिलांना शिवीगाळ, भांडण सोडवणाऱ्या शाळकरी मुलावर सपासप वार
दरम्यान, विवाहानंतर तरुणी सातत्याने फोनवर बोलत असायची. पतीला ती सातत्याने व्हिडीओ कॉल आणि चॅटिंग करत असल्याचं निदर्शनास आलं. एमकॉमची परीक्षा देण्यासाठी विवाहित तरुणी माहेरी गेली होती. मात्र, सासरी परत आल्यानंतर तिने तीन तोळ्यांचं गंठण हरवल्याची माहिती तिच्या पतीला दिली. त्यानंतर पतीचा तिचा मोबाईल तपासला असता तिला समलिंगी विवाहाची माहिती मिळाली.
दरम्यान, पतीने तिच्या पुण्यातील गर्लफ्रेंडसोबत समलिंगी विवाह केल्याचं समजल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. तरुणीचे गर्लफ्रेंडसोबत अश्लील चॅट, वॉशरुममधील विवस्त्र केलेले व्हिडीओ पतीला तिच्या मोबाईलमध्ये सापडले. त्यानंतर तो प्रचंड संतापला आणि मुलीच्या वडिलांना याबाबतचा जाब विचारला. मात्र, त्यांच्याकडूनही त्याला धमकी देण्यात आली आणि शिवीगाळही करण्यात आली.
हेही वाचा : संपत्तीचा वाद टोकाला पोहोचला! पोटच्या मुलानेच बिझनेस पार्टनरसोबत मिळून... मुंबईतील व्यावसायिकासोबत काय घडलं?
ADVERTISEMENT
