Nilima Chavan News : नीलिमा मृत्यू प्रकरणी SBI प्रोजेक्ट मॅनेजरला अटक, कारण…

मुंबई तक

18 Aug 2023 (अपडेटेड: 18 Aug 2023, 03:13 PM)

Nilima Chavan Death Case update : police arrested sangram gaikwad, who is working sbi dapoli branch as project manager. nilima chavan family alleged that sangram gaikwad was pressuring to her.

nilima chavan news today : sangram gaikwad, project manager of sbi at dapoli branch arrested.

nilima chavan news today : sangram gaikwad, project manager of sbi at dapoli branch arrested.

follow google news

-गोकूळ कांबळे, रत्नागिरी

हे वाचलं का?

Nilima chavan death update : नीलिमा चव्हाण मृत्यु प्रकरणी पोलिसांनी आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दापोली शाखेतील प्रोजेक्ट मॅनेजरला अटक केलीये. संग्राम गायकवाड असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. (nilima chavan chiplun latest news : Police arrested sbi project manager of Dapoli branch)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नीलिमा चव्हाण हिच्यावर बँकेतील एक कर्मचारी वारंवार कामासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. त्याच्याविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.

या तक्रारीनुसार प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम सुदेश गायकवाड याच्या विरुद्ध नीलिमा चव्हाण हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

नीलिमा चव्हाण मृत्यू… कुटुंबीयांचे आरोप काय?

गायकवाड हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली (पन्हाळा) येथील असून, सध्या टीआरपी रत्नागिरी इथे वास्तव्यास आहे. फिर्यादी म्हणजेच नीलिमा चव्हाण हिचे वडील सुधाकर तुकाराम चव्हाण यांनी आपली मुलगी दापोली येथील ज्या बँकेत काम करत होती, त्या ठिकाणी दैनंदिन कामाची माहिती संग्राम गायकवाड याला द्यावी लागत असल्याचं सांगितल आहे.

वाचा >> Mumbai crime: सेक्सला नकार… 18 वर्षीय मैत्रिणीचं भिंतीवर आपटलं डोकं, उशीने दाबलं तोंड

तिच्या कामात नेहमी 15 दिवसांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी तिला वारंवार सुट्टीवर असताना फोन येत असत, असा आरोप त्यांनी केलेला आहे. तसचं आपल्या मुलीला दिवसाला चार ते पाच डीमॅट खाती उघडण्यासाठी गायकवाड जाणूनबुजून दबाव टाकत होता. सुट्टीच्या दिवशी प्रत्येक वेळी नीलिमा मला आणि तिच्या भावाला हे सांगत होती, असे तक्रारीत नमूद केलेलं आहे.

संग्राम गायकवाडने नीलिमा चव्हाणला दिली होती धमकी

नोकरी लागल्यापासून गायकवाड नीलिमावर कामाच्या संदर्भात सातत्याने दबाव टाकत होता. तिला काम जमत नसल्याचं सांगून नोकरीवरून कमी करण्याची धमकी देखील देण्यात आली होती. यातूनच नीलिमाच्या मनावरील ताण वाढत होता. तसचं गेले काही दिवस ती घरात व्यवस्थित जेवत देखील नव्हती अस या फिर्यादीत नमूद केलं आहे.

वाचा >> Kalyan Crime: आईसमोरच सपासप वार…! 12 वर्षाच्या मुलीने सोडला जीव

दरम्यान या प्रकरणी नीलिमाच्या मृत्यूचं कारण आत्महत्या आहे की घातपात, याबद्दल पुरावा मिळाला नसल्याचं पोलिसांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. तिच्या व्हीसेरा अहवालात देखील कोणत्याही प्रकारचं विष दिसून आलं नाही, अस नमूद केलेलं आहे. त्यातच आता गायकवाडला अटक झाल्याने मृत्यूचं गूढ वाढलं आहे.

    follow whatsapp