Crime News: उत्तर प्रदेशातील सुल्तानपूर येथील पूर्वांचल एक्स्प्रेस वेवरील हलियापूर टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्यांच्या घाणेरड्या कृत्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. आरोपी कर्मचाऱ्यांनी हायवेवरील हायटेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करून जोडप्यांचे त्यांच्या कारमधील अश्लील आणि प्रायव्हेट व्हिडीओ रेकॉर्ड केले. या प्रकरणाने सर्वत्र एकच खळबळ उडाली.
ADVERTISEMENT
25 ऑक्टोबर रोजी आझमगडहून लखनऊला जाताना एका नवविवाहित जोडप्याचे कारमधील खाजगी क्षण असलेलं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं. 2 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सुल्तानपूर जिल्हा दंडाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना या प्रकरणाबाबत पत्र लिहिण्यात आलं. आरोपींनी पीडित जोडप्याला 32,000 रुपयांसाठी ब्लॅकमेल केल्याचा देखील आरोप आहे. मात्र, पैसे देऊन पीडितांचे व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला.
हजारो कपल्सचे व्हिडीओ रेकॉर्ड...
या प्रकरणातील आरोपी मॅनेजर आशुतोष सरकारला पोलिसांनी अटक केल्याची माहिती आहे. चौकशीदरम्यान, आरोपी आशुतोषने केलेल्या विधानामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी, अशा पद्धतीने हजारो कपल्सचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आल्याचा आशुतोषने खळबळजनक खुलासा केला.
आरोपीचा खळबळजनक जबाब
पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी म्हणाला की, ज्या कर्मचाऱ्यांनी पूर्वी कामावरून काढून टाकण्यात आलं, त्यांनीच हे कृत्य केलंय. आरोपी म्हणाला की, पूर्वी ज्या कर्मचाऱ्यांना टोल प्लाझावरून काढून टाकण्यात आले होतं त्यांनी धमकी दिली होती की जर ते इथे काम करू शकत नसतील तर जे कर्मचारी इथे काम करत आहेत, त्यांनाही ते काम करू देणार नाही. आरोपीने म्हटलं की, ज्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं ते वेळेवर काम न करणारे आणि कामात निष्काळजीपणा करणारे होते. त्यांच्याविरुद्ध तक्रारी दाखल केल्या गेल्या आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात आली तेव्हा ते अतिशय संतापले.
हे ही वाचा: रक्ताने माखलेल्या अन् अर्धनग्न अवस्थेत महिलेचा मृतदेह... शेतातील घरात पीडितेसोबत काय घडलं?
आरोपीने नेमकं काय सांगितलं?
आरोपीने स्पष्ट केलं की, असे व्हिडिओ गेल्या अडीच वर्षांपासून रेकॉर्ड केले जात होते. या काळात तब्बल हजारो जोडप्यांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले गेले. मात्र, त्यापैकी एकही व्हिडिओ व्हायरल झालेला नाही. व्हायरल झालेला व्हिडिओ आधीच्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या ड्रायव्हरला दिला होता. त्याला खात्री होती की ड्रायव्हर व्हिडिओ व्हायरल करणार नाही, परंतु त्याने ते चुकीचं कृत्य केलं.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी आणखी एक मेट्रो! पहिल्यांदाच शहरातील अंतर्गत भागांना जोडणार, 'इतक्या' स्थानकांचं कनेक्शन...
अँटी-ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (एटीएमएस) चं काम पाहणाऱ्या वेंडर कंपनीने आशुतोष सरकार, सिस्टम टेक्निशियन आशुतोष तिवारी, ट्रॅफिक मॅनेजर शशांक शेखर आणि सिस्टिम इंजिनिअर प्रमोद कुमार यांना कामावरून काढून टाकले आहे. या चौघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तिघांना तुरुंगातही पाठवलं आहे. या प्रकरणात सहभागी असलेला शशांक शेखर फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











