बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध... भावाने प्रियकराला भेटण्याच्या बहाण्याने पार्कमध्ये बोलवलं अन् रक्तरंजित थरार!

भावाचा आपल्या बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याकारणाने त्याने तिच्या प्रियकराच्या हत्येची योजना आखली. आरोपीने पीडित तरुणाला भेटण्याच्या बहाण्याने पार्कमध्ये बोलवलं आणि त्यानंतर भयानक घटना घडली.

भेटण्याच्या बहाण्याने पार्कमध्ये बोलवलं अन्...

भेटण्याच्या बहाण्याने पार्कमध्ये बोलवलं अन्...

मुंबई तक

• 10:24 AM • 18 Jan 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

बहिणीच्या प्रेमसंबंधाला भावाचा विरोध...

point

प्रियकराला भेटण्याच्या बहाण्याने पार्कमध्ये बोलवलं अन् रक्तरंजित थरार!

point

नेमकं प्रकरण काय?

Crime News: प्रेमसंबंधातून बऱ्याच धक्कादायक घटना घडत असल्याच्या बातम्या समोर येतात. दिल्लीच्या रोहिणी परिसरातून देखील अशीच एक घटना उघडकीस आली आहे. येथे एका तरुणाला सोशल मीडियाच्या माध्यमातून सार्वजनिक पार्कमध्ये भेटण्यासाठी बोलवण्यात आलं आणि तिथे त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याची निर्दयी हत्या करण्यात आली. या प्रकरणात, पोलिसांनी 5 अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

बहिणीच्या प्रियकराच्या हत्येची योजना   

मिळालेल्या माहितीनुसार, 15 जानेवारी रोजी दिल्लीच्या रोहिणी परिसरातील एका पार्कमध्ये ही घटना घडली. दिव्यांशु (18) अशी मृत तरुणाची ओळख समोर आली असून त्याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, त्याच्या प्रेयसीच्या कुटुंबियांचा या नात्याला पूर्णपणे विरोध होता. त्यामुळे, संबंधित तरुणीच्या भावाने तिच्या प्रियकराच्या हत्येची योजना आखल्याचं पोलीस तपासात समोर आलं. 

भेटण्याच्या बहाण्याने पार्कमध्ये बोलवलं अन्... 

आरोपी तरुण हा 17 वर्षीय असून त्याचा त्याच्या बहिणीच्या प्रेमसंबंधाला विरोध होता. याच रागातून, त्याने दिव्यांशुला संपवण्याचा कट रचला. आरोपीने त्याच्या एका मित्राच्या सोशल मीडिया अकाउंटचा वापर करून पीडित तरुणाशी संपर्क साधला. त्याने दिव्यांशुला भेटण्याच्या बहाण्याने रोहिणी परिसरातील एका सार्वजनिक पार्कमध्ये बोलवलं. त्यानंतर, तो निश्चित वेळेत त्या पार्कमध्ये पोहोचला. 

हे ही वाचा: लग्न होऊन 8 महिने झालं तरीही डॉक्टर असलेल्या प्रियकराला विसरता येईना, शेवटी नवऱ्याचा काटा काढला; भयंकर कट रचला

चाकूने वार करून निर्घृण हत्या 

पार्कमध्ये पोहोचताच दिव्यांशुवर चाकूने वार करण्यात आले. दुपारी जवळपास 3 वाजताच्या सुमारास पोलिसांना PCR कॉलच्या माध्यमातून संबंधित घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच, पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यावेळी, पीडित दिव्यांशु रक्ताने माखलेल्या अवस्थेत आढळला. त्यानंतर, त्याला त्वरीत BSA रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आता, या प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही वाचा: ‘आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय करणार, पळवापळवीची आवश्यकता नाही..’, हॉटेल पॉलिटिक्सवर फडणवीसांची प्रतिक्रिया

प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि टेक्निकल पुराव्यांच्या आधारे, पोलिसांनी 24 तासांच्या आत पाचही अल्पवयीन मुलांना अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून हत्येत वापरलेला चाकू, पीडित तरुणाचा मोबाईल फोन, घड्याळ आणि एक मेटल ब्रेसलेट जप्त केलं आहे. हे पाचही आरोपी त्याच परिसरातील रहिवासी असून ते एकाच शाळेत शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp