पेटलेले कपड्याचे बोळे, पेट्रोल घरात फेकलं, कुटुंब घरात झोपेत असतानाच आग लावली; पंढरपुरात तिघांना...

 पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, घर पेटवण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

01 May 2025 (अपडेटेड: 01 May 2025, 01:18 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पंढरपूरमध्ये धक्कादायक घटना

point

कुटुंब घरात झोपलेलं असताना पेटवलं घर

point

तिघांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न

पंढरपूर : पंढरपूर शहरातील इसबावी परिसरातील बसवेश्वर नगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री तीन वाजता एक कुटुंब घरात झोपलेलं असताना, अज्ञातांनी घराला पेट्रोलचे पेटते बोळे टाकून आग लावली. या आगीत घरातील सर्व साहित्य जळून खाक झालं असून, नागनाथ कदम, योगेश कदम आणि सुबोध कदम हे तिघे गंभीररित्या भाजले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> घराबाहेर पाकिस्तानी लष्कर, 4 किमीपर्यंत सीसीटीव्हीची नजर, ड्रोनने पाळत! हाफिज अड्ड्याभोवती सुरक्षेचं कडं कसं?

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री तीनच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने कदम यांच्या घराच्या खिडकीतून पेट्रोलचे पेटते बोळे टाकले गेले. यामुळे घराला आग लागली आणि काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. आजूबाजूच्या नागरिकांनी ही घटना पाहताच तातडीने पोलिस आणि नगरपालिकेच्या अग्निशामक दलाला कळवले. अग्निशामक दलाने आग विझवून जखमींना बाहेर काढले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले.

हे ही वााचा >> नवऱ्याची दाढी आवडत नव्हती म्हणून... दीरासोबत गेली पळून; हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही बरं का!

दरम्यान,  पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, घर पेटवण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. शहरातील भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे.

    follow whatsapp