तरुण घरात शिरला, मुलीला बाहेर काढलं अन् दरवाजा लावून आशा वर्करसोबत...

एक तरुण आशा वर्करच्या घरात शिरला. त्याने त्या आशा वर्करच्या 17 वर्षीय मुलीला घराबाहेर काढलं अन् दरवाजा लावून घेतला. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने तिने पोलिसांना फोन केला. बंद दरवाजा आत पोलिसांना काय दिसलं? जाणून घेऊया.

Crime News

Crime News

मुंबई तक

11 Jun 2026 (अपडेटेड: 11 Jun 2026, 12:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तरुण घरात शिरला

point

मुलीला बाहेर काढलं

point

अन् दरवाजा लावून आशा वर्करसोबत...

Crime News : एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. 37 वर्षीय आशा कार्यकर्त्या रजनी शुक्ला यांचा त्यांच्याच घरात संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले. या संपूर्ण प्रकरणात सुरेंद्र उर्फ सीताराम तिवारी नावाच्या एका युवकाचे नाव समोर आले असून, धक्कादायक बाब म्हणजे तो युवकही त्याच घरात मृतावस्थेत आढळून आला. या दुहेरी मृत्यूच्या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

दरवाजा बंद केला अन्...

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना घडली तेव्हा रजनी शुक्ला यांची 17 वर्षांची मुलगी घरातच हजर होती. आरोपी सुरेंद्र याने मुलीला खोलीतून ओढत बाहेर काढले आणि घराचा दरवाजा आतून घट्ट बंद करून घेतला. यानंतर त्याने रजनी यांच्यावर एकामागून एक सपासप वार करत जीवघेणा हल्ला चढवला. या भीषण हल्ल्यात अत्यंत तडफडून रजनी यांचा जागेवरच मृत्यू झाला. मात्र, हे हत्याकांड घडवून आणल्यानंतर आरोपीने पोलीस आणि कायद्याच्या भीतीने त्याच खोलीत सल्फासच्या गोळ्या खाऊन आपली जीवनयात्रा संपवली.

हे ही वाचा : वसतीगृह चालकाची बायको परपुरुषासोबत दिसली, विद्यार्थी आवाज करणार इतक्यात..

नागरिकांनी केली गर्दी

घाबरलेल्या मुलीने तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बंद दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता, त्यांना रजनी शुक्ला आणि सुरेंद्र उर्फ सीताराम तिवारी या दोघांचेही मृतदेह आढळून आले. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमससाठी रुग्णालयात पाठवले असून घटनास्थळाचा पंचनामा केला आहे.

हे ही वाचा : प्रेयसीचा लग्नासाठी दबाव, प्रियकराने मित्रांना बोलावलं अन्...

नेमकं कारण काय?

या दुर्दैवी आणि अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आशा वर्करच्या हत्येमागील आणि आरोपीच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस सध्या मृत महिलेच्या कुटुंबीयांची आणि आजूबाजूच्या लोकांची कसून चौकशी करत असून विविध बाजूंनी या प्रकरणाचा तपास सुरू आहे. संपूर्ण पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच या हत्याकांडामागचे खरे रहस्य समोर येऊ शकेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.