पुण्यात खळबळ! आधी पत्नी-पुतण्याला घातल्या गोळ्या, नंतर केली आत्महत्या

मुंबई तक

24 Jul 2023 (अपडेटेड: 24 Jul 2023, 03:29 AM)

अमरावती येथे सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या भारत गायकवाड यांनी पत्नी आणि पुतण्याची गोळ्या झाडून हत्या केली.

In the pune city police officer killed his wife and nephew and committed suicide.

In the pune city police officer killed his wife and nephew and committed suicide.

follow google news

Pune Crime News : पुणे शहरात हादरवून टाकणारी घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची गोळ्या घालून हत्या केली. त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवारी म्हणजे 24 जुलै रोजी पहाटे 4 वाजता घडली.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार पत्नी आणि पुतण्याची हत्या करणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव भारत गायकवाड असे असून, ते अमरावती पोलीस दलात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. सोमवारी (24 जुलै) पहाटे 4 वाजता त्यांनी पत्नी आणि पुतण्याला गोळ्या घालून ठार केले.

वाचा >> Irshalwadi Landslide : अश्रु आटले, डोळे थिजले… शेवटचं बघायची इच्छा राहिली अपूर्णच

भारत गायकवाड यांच्या पत्नीचे नाव मोनी गायकवाड (वय 44), पुतण्याचे नाव दीपक गायकवाड (वय 35) असे आहे. या हत्याकाडांची माहिती समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती दिली गेली. त्यानंतर पोलिसांनी हत्याकांड घडलेल्या ठिकाणी धाव घेतली.

वाचा >> Lok Sabha 2024 : सत्तेच्या ‘हॅटट्रिक’साठी खास स्ट्रेटजी! 338 खासदारांच्या 10 टीम, मोदी बघणार रिपोर्ट

अमरावती पोलीस दलात कार्यरत असलेले भारत गायकवाड यांचे कुटुंब पुण्यात वास्तव्याला होते. भारत गायकवाड यांनी पहाटे गोळीबार केल्याने परिसरात आवाज आला. पत्नी मोनी गायकवाड आणि पुतण्या दीपक गायकवाड यात जागीच मरण पावले. त्यानंतर भारत गायकवाड यांनी स्वतःलाही संपवले.

वाचा >> Crime: ‘माझी आई मरून जाईल’, डॉक्टरला घरी बोलवलं अन् तरुणी झाली नग्न; नंतर…

पोलीस दलात मोठ्या पदावर कार्यरत असलेल्या भारत गायकवाड यांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले? त्यांनी पत्नी, पुतण्याला संपवून आत्महत्या का केली? असे प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले असून, पोलिसांनी त्या अनुषंगाने आता तपास सुरू केला आहे.

    follow whatsapp