Married Woman Shocking Viral News : केरळमध्ये वेल्लंगुलार येथील एका गर्भवती महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. फसीला (23) असं या महिलेचं नाव आहे. फसीला दुसऱ्यांदा गरोदर होती, पण तिच्या नराधम पतीने तिच्या पोटावर लात मारली. पतीच्या जाचाला कंटाळून पत्नी फसीलाने 29 जुलै रोजी गळफास घेऊन स्वत:ला संपवलं. पण फसीलाने हा टोकाचा निर्णय का घेतला? यामागचं नेमकं कारण काय आहे? जाणून घ्या.
ADVERTISEMENT
याबाबत सविस्तर वृत्त असं की, हे प्रकरण केरळच्या त्रिशुर जिल्ह्यातील वेल्लंगुलार येथील आहे. 23 वर्षांच्या प्रेग्नंट फसीलाने 29 जुलै रोजी गळफास लावून जीवन संपवलं. आत्महत्या करण्यापूर्वी फसीलाने तिच्या आईला व्हाट्सअॅपवर काही मेसेज पाठवले होते. या मेसेजमध्ये तिने लिहिलं होतं की, मी दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे आणि पतीने अनेकदा पोटावर लाथ मारली आहे. हातावरही मारहाण केली. सासूनेही माझा छळ केला. मी स्वत:चं जीवन संपवणार आहे. नाहीतर हे लोक मला मारून टाकतील. या मेसेजनंतर फसीलाने आत्महत्या केली.
हे ही वाचा >> रमीने होत्याचं नव्हतं केलं.. अखेर माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं काढून घेतलं! नवे कृषी मंत्री कोण?
पोलिसांनी आरोपी सासू आणि पतीला केली अटक
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टम केलं आणि मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द केला. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. याप्रकरणी इरिंजालाकुडा पोलिसांनी फसीलाचा पती नौफेल आणि त्याची आई रामलाला अटक केली आहे.
फसीलाच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली. कुटुंबियांचे आरोप आणि पुरावांच्या आधारावर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फसीलाला एक मुलगाही आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहेत.
हे ही वाचा >> रमीने होत्याचं नव्हतं केलं.. अखेर माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं काढून घेतलं! नवे कृषी मंत्री कोण?
ADVERTISEMENT
