Pune Crime : शिक्षणाचं माहेरघर असणारं पुणे आता गुन्हेगारीचं हॉटस्पॉट झालंय असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. पुणे शहरात दररोज भररस्त्यात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. अशातच आता पुण्यात शिंदे गटाचे शिवसेनेच्या युवासेनेचे पुणे जिल्हाप्रमुख निलेश राजेंद्र घारे यांच्या गाडीवर मध्यरात्री गोळीबार करण्यात आला. ही घटना पुण्यातील वारजे माळवाडी येथे सोमवारी 12 वाजताच्या सुमारास घडली आहे. गोळीबार करणारे अज्ञात एका दुचाकीवरून आले होते. त्यावेळी त्यांनी कारवर गोळीबार केला. त्याचा फोटो आता समोर आला आहे.
हेही वाचा : जन्मदात्या आईनं प्रियकरासाठी लेकाचा गळा घोटला, दाताने लचके तोडले; हादरवून टाकणारी घटना
ADVERTISEMENT
संबंधित प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, निलेश घारे हे गणपती माथा येथील शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यलयात आपल्या काही सहकाऱ्यांसोबत होते. त्याचवेळी हा धक्कादायक प्रकर घडला. बाहेर पार्क करण्यात आलेल्या कारवर काही अज्ञातांनी गोळीबार करत हल्ला केला. या गोळीबारादरम्यान कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलिसांकडून संबंधित प्रकरणाचा खोलवर तपास करणं सुरु आहे. या घटनेनं पुण्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
निलेश घारे हे शिंदे गटाच्या माथा परिसरातील जनसंपर्क कार्यालयात आपल्या सहकाऱ्यांऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. अशावेळी अज्ञातांची दुचाकीवरुन कारवर गोळीबार केला. सुदैवाने त्यांच्या कारमध्ये कोणीही नव्हते. यामुळे जीवितहानी टळली गेली. पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत.
गोळीबार करणारे नेमके कोण आहेत? निलेश घारे यांच्या कारवर गोळीबार करण्यामागचं कारण काय? असे काही प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. याचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत.
हेही वाचा : पहलगाम हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्रा म्हणाली, 'हल्ल्याला सर्वस्वी सरकार...' व्हिडिओ होतोय व्हायरल
दरम्यान, पुणे शहरात सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. यामुळे पुन्हा एकदा पुणे पोलीस या गुन्हेगारांना अटोक्यात आणण्यासाठी कुठेतरी अपयशी ठरतायत का? असा पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्न निर्माण होत आहे. अशातच आता पुण्यात कोयता गँगने पुन्हा डोकं वर काढलं आहे. अशा सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे पुण्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
ADVERTISEMENT
