सोनमने मारेकऱ्यांना केला इशारा अन् त्या सेकंदभरात राजाचा खेळ खल्लास, घटनास्थळी...

मुंबई तक

11 Jun 2025 (अपडेटेड: 12 Jun 2025, 12:54 AM)

raja raghuwanshi case : राजा रघुवंशी हत्येच्या प्रकरणाचे अनेक खुलासे आता समोर येऊ लागले आहेत. इंदूरच्या या निष्पाप वाहतूक व्यवसायिकाची हत्या का केली असावी? या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे.

raja raghuwanshi case

raja raghuwanshi case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राजा रघुवंशी हत्याकांडप्रकरणात मोठे खुलासे

point

घटनेचा घटनाक्रम आला समोर

Raja Raghuwanshi Case : राजा राघुवंशीच्या हत्या प्रकरणात खळबळजनक खुलासे समोर येऊ लागलेत. इंदूरच्या या निष्पाप वाहतूक व्यवसायिकाची हत्या का केली असावी? या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे. दरम्यान, राजा रघुवंशीची पत्नी सोनमने लग्नाच्या 10 दिवसानंतर हनीमूनच्या बहाण्याने सिक्कीम येथे पतीला कायम जीवे मारण्याचा कट रचला होता. हत्येच्यापूर्वी सोनमने दिलेल्या एका इशाऱ्यामुळे राजा रघुवंशीला आपला जीव गमवावा लागला आहे.  

हे वाचलं का?

हेही वाचा : गुरू आणि शुक्र ग्रह तब्बल 12 वर्षानंतर एकत्र येणार, 'या' राशीतील लोकांच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार

मेघालयाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विवेक सय्यम यांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, अटकेत असणाऱ्या आरोपींनी राजा रघुवंशीला मारल्याचा कबुली जबाब दिला. त्यानंतर पत्नी सोनमच्या हावभावावरुन तिन्ही हल्लेखोरांनी गोळीबार केला. यावेळी विशाल नावाच्या हल्लेखोराने पहिला हल्ला केला आणि काही सेंकदातच सोनमच्या डोळ्यासमोर राजा रघुवंशीचा मृत्यू झाला. 

या हत्येचा कट उघड करण्यासाठी मेघालय पोलिसांनी 'ऑपरेशन हनीमून'अंतर्गत शोधमोहिम सुरु केली. त्यानंतर सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहने हल्लेखोरांशी हात मिळवणी करत सोनमच्या पतीला मारण्याचा कट रचला. 

खूनचा कट 

सोनमच्या पतीची हत्या करण्यासाठी त्यांनी कट रचला होता. ते सर्व आरोपी 21 मे रोजी गुवाहाटी येथे पोहोचले. 

त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 मे रोजी सोनमच्या मागे शिलाँगला गेले. 

रचलेल्या कटाप्रमाणे 23 मे रोजी हत्येची घटना घडली. त्यानंतर ते ट्रेनद्वारे इंदूरकडे पोहोचले. 

इंदूरला पोहोचल्यानंतर, सोनम तिच्या प्रियकराला भेटली, त्यानंतर तिला उत्तर प्रदेशात पाठवण्यात आले आहे.

सीसीटीव्हीतून घटनेचा भांडाफोड झाला आणि खरं गुपित समोर आलं. 

हत्येवेळी नेमकं काय घडलं? 

हत्येवेळी सोनम ही तिन्ही मारेकऱ्यांसोबत होती, गुन्ह्याच्या 10 किमी अंतराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. हत्येनंतर सोनम आणि आरोपी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये राहिले होते. खूनात सहभागी असलेल्या आकाशच्या शर्टाला रक्त लागलं असल्याने पोलिसांनी आकाशला ताब्यात घेतलं. तसेच सोनमने आकाशला दिलेला रेनकोट खून केलेल्या परिसरात 6 किमी अंतरावर सापडला. तसेच गुन्ह्याच्या ठिकाणी मोबाईल स्क्रीनही सापडली होती, त्याचवेळी पोलिसांनी आरोपी आनंदच्या मुसक्या आवळल्या आहेत.  

हेही वाचा : माहेरहून गाय आण, स्कुटीसाठी पैसे आण म्हणत सासरच्यांनी छळलं, सुनेनं विहिरीत उडी मारून...

दरम्यान, हत्येनंतर मध्यरात्री 2 वाजून 15 मिनिटांनी सोशल मीडियावर 'सात जन्मो का साथी' अशी पोस्ट केली. यावरुन पोलिसांना या हत्येसंबंधित आणखी संशय बळावला गेला. या पोस्टमागचं नेमकं कारण काय? ही पोस्ट नेमकी अशा वेळी कशी केली? असे प्रश्न पोलिसांनी उपस्थित केले. यावेळी सोनमने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. आम्ही एकत्रच असल्याचा भ्रम तिनं पसरवला आणि तोच भ्रम तिच्याच अंगलट आला.