Rajendra Hagawane Arrested : राज्याला हादरवून सोडणाऱ्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे.
ADVERTISEMENT
स्वारगेट परिसरातून अटक
आज पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट परिसरातून त्यांना ताब्यात घेतलं आहे. गेल्या आठ दिवसांपासून फरार असलेल्या या दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची सहा पथकं कार्यरत होती. अटकेनंतर स्वारगेटमधील ज्या हॉटेलमध्ये हे दोघं थांबले होते, तिथले सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे.
हे ही वाचा >> रिनाने पुतण्यासाठी नवऱ्यासोबत केला कांड, पुतण्याने पॉर्न व्हिडिओ डाऊनलोड केले अन् काकीसोबत...
वैष्णवी शशांक हगवणे यांनी 16 मे रोजी मुळशी तालुक्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीत सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता. यामुळे वैष्णवीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना यापूर्वीच अटक केली असून, त्यांना 26 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हे ही वाचा >> अमानुष मारहाण, मोबाईल हिसकावून पळाला.... मयुरीने CCTV दाखवले, हगवणे कुटुंबानं कसं छळलं ते सांगितलं
दरम्यान, वैष्णवीच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. वैष्णवीच्या लग्नात तिच्या माहेरकडून 51 तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची भांडी देण्यात आली होती. तरीही सासरच्या मंडळींनी दोन कोटी रुपयांच्या अतिरिक्त हुंड्याची मागणी करत तिचा छळ केल्याचा दावा आहे.
ADVERTISEMENT
