कौशांबी (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील कौशांबी येथे एका महिलेने एक खळबळजनक आरोप केला आहे. ती म्हणते की, 6 महिन्यांपूर्वी ती आंघोळ करत असताना अभिषेक प्रजापती नावाचा एक तरुण तिच्या घरी आला आणि जबरदस्तीने बाथरूममध्ये घुसला आणि त्याने तिचा व्हिडिओ शूट केला. त्यानंतर तो तरुण तिच्या आयुष्याशी आणि इभ्रतीशी खेळू लागला, असा महिलेचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
पीडितेचा आरोप आहे की, आरोपी तरुणाने व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि तिला ब्लॅकमेल केले. त्याने तिच्यासोबत अनेक वेळा घाणेरडे कृत्य केले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून सोने-चांदीचे दागिने आणि पैसे घेत राहिला.
हे ही वाचा>> रिनाने पुतण्यासाठी नवऱ्यासोबत केला कांड, पुतण्याने पॉर्न व्हिडिओ डाऊनलोड केले अन् काकीसोबत...
व्हिडिओ केला व्हायरल
कौशांबीच्या मंझनपूर कोतवाली भागातील रहिवासी असलेल्या पीडित महिलेचा आरोप आहे की, यानंतरही आरोपी तरुणाने तिचा व्हिडिओ व्हायरल केला आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, भीती आणि सामाजिक कलंकामुळे ती त्याच्या सर्व मागण्या पूर्ण करत होती. तिने खात्यात पैसेही ट्रान्सफर केले. पण त्याची मागणी सतत वाढत होती. पीडितेने एक-दोनदा त्याची मागणी पूर्ण केली नाही तेव्हा त्याने तिचा व्हिडिओ व्हायरल केला.
महिलेने पोलिसांकडे घेतली धाव
पीडित महिलेने पोलिसांना भेटून संपूर्ण घटना सांगितली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे आणि गंभीर कलमे लावली आहेत. सध्या कौशांबी पोलिसांनी आरोपीसा अटक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि पोलिसांचे एक पथक देखील तयार करण्यात आले आहे.
हे ही वाचा>> ज्योती मल्होत्राने पाकिस्तानी अधिकाऱ्याशी लग्न केलेलं? पोलिसांनी सांगितलं सत्य!
या प्रकरणात पोलिसांनी काय म्हटले?
या संपूर्ण प्रकरणावर सदर सीओ शिवांक सिंह म्हणाले की, महिलेने तक्रार दाखल केली आहे. बलात्कार आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप आहे. तसंच महिलेला ब्लॅकमेल देखील करण्यात आलं. गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपीला लवकरच अटक केली जाईल.
ADVERTISEMENT
