Crime News : उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली आहे. महिलेचे तिच्या पुतण्यासोबत संबंध होते. त्यांच्या नात्याला पतीचा अडथळ निर्माण होत असल्याने पत्नीने पुतण्याच्या मदतीने पतीला संपवलं. हे प्रकरण लपवण्यासाठी तिने घराच्या शेजारी राहणाऱ्या दोघांवर हत्येचा आरोप रचला. या हत्येवरून एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दोघांनाही आपल्या ताब्यात घेतलं आहे. या घटनेला काही दिवस झाले आहे. या प्रकरणाला आता एक वेगळ वळण प्राप्त झालं आहे. दरम्यान, मृत व्यक्तीच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. पत्नीने तिच्या पतीला मारहाण करत ठार मारलं. पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीलाच नसून पुतण्यालाही अटक केली आहे. मृताच्या पत्नीचे तिच्याच पुतण्यासोबत नातेसंबंध होते. यामुळे दोघांनी मिळून व्यक्तीची हत्या केली आहे.
हेही वाचा : पुण्यात 10 वर्षाचा चिमुकल्याचा एका झटक्यात गेला जीव, नेमकं घडलं तरी काय?
ADVERTISEMENT
नेमकं प्रकरण काय?
उत्तर प्रदेशातील कानपूरमधील घाटमपूर येथे एक खळबळजनक प्रकार घडला आहे. ज्यात 11 मे रोजी धीरेंद्र नावाच्या एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. त्याच्या डोक्याला जबर मार लागला होता. यातच त्याचा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. अशावेळी त्याने शेजारी असणाऱ्या कीर्ती यादव आणि त्याच्या मुलावर या खूनाचा आरोप केला आहे.
गावकरी संबंधित प्रकरणात रिनाला पाठिंबा देत होते. अशावेळी काही नेते मंडळी आणि काही राजकीय पक्षांनी या प्रकरणात उडी घेतली. रिना म्हणाली होती की, तिचा पती धीरेंद्रचा ट्रॅक्टर खराब झाला होता. याच वादावरून तिच्या पतीचं आणि शेजारी राहणाऱ्या कीर्ती यादव यांच्यात वादंग निर्माण झाला होता. रिनाने आरोप केला की, याच लोकांनी माझ्या पतीची हत्या केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात लक्ष्य घालत तपास सुरू केला आहे. ज्यात पोलिसांनी कीर्ती यादव आणि त्याच्या मुलाला ताब्यात घेतलं. या प्रकरणाचा पोलिस पुढील तपास करत आहे.
पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. तसेच तपासयंत्रणाही आपली चोख भूमिका बजावण्याचं काम करत आहेत. ज्यावेळी घटनास्थळी व्यक्तीचा मृतदेह पडला होता. अशावेळी श्वानांच्या मदतीने तपास करण्यात आला. अशावेळी श्वान हे मृत व्यक्तीच्या दुकानामागे गेले. यानंतर ते घराच्या वरांड्यात बसून राहिले. अशावेळी शेजारच्यांनी हत्या केली असेल तर त्यांनी घरात का मारले? असा प्रश्न उपस्थित झाला.
पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचूकली
यानंतर पोलिसांना मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या पत्नीवर शंका व्यक्त केली. अशावेळी तिचा मोबाईल फोन तपासण्यात आला होता. अशावेळी काही कॉल रेकॉर्डिंग समोर आले. ज्यात मृत व्यक्तीच्या पत्नीने धीरेंद्रच्या भाच्याला तब्बल 40 वेळा फोन केले होते. या प्रकरणाच्या तपासातून खुलासा करण्यात आला की, मृत व्यक्तीची पत्नी रिना आणि तिचा भाचा सत्यम हे एकमेकांच्या संपर्कात होते. त्यांचे एकमेंकांसोबत खूप सारं फोनद्वारे बोलणं व्हायचं.
हेही वाचा : महिलेनं तब्बल 25 तरुणांशी केलं लग्न; नंतर पैसे घेऊन व्हायची फरार, बाईईई काय हा प्रकार...
हे सर्व पाहून पोलिसांनी सत्यमला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी करण्यास सुरूवात केली. त्यांनी काही वेळातच सर्व घडलेल्या घटनेचा प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी पत्नी रीनाकडे या प्रकरणाची चौकशी केली असता, मृत व्यक्तीच्या पत्नीने आपले संबंध सत्यमसोबत असल्याचं सांगितलं. त्यातूनच पतीला संपवण्यात आल्याचं या प्रकरणातून समोर आलं.
दरम्यान, या हत्येतील पुरावे आणि दावे नष्ट करण्यात आले. याचं सर्व प्रकरण आणि यांचा गेम प्लान पोलिसांच्या लक्षात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी माहिती दिली आहे. ते म्हणाले की, मृत झालेल्या पत्नीने आपले आपल्या भाच्यासोबत संबंध असल्याचे सांगितले. रिनाच्या पत्नीने तिला आणि भाचाला रंगेहात पकडलं होतं. दोघांनीही त्यांना मारहाण केली. दरम्यान, पत्नीला आणि तिचा प्रियकर असणाऱ्या भाच्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे.
ADVERTISEMENT
