कानपूर: कानपूरच्या साध भागातील लक्ष्मणपूर गावात 11 मे रोजी झालेल्या धीरेंद्र नावाच्या व्यक्तीच्या हत्येचा खळबळजनक खुलासा तब्बल 7 दिवसांनंतर झाला आहे. मृत धीरेंद्रची पत्नी रिना आणि तिचा पुतण्या प्रियकर सतीश हेच हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. पोलिसांनी दोघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले आहे. या प्रकरणातील धक्कादायक गोष्ट म्हणजे हत्येनंतर पत्नीने निष्पाप शेजाऱ्यांवर आरोप केले आणि त्यांना तुरुंगात पाठवलं. पण आता सत्य बाहेर आल्याने संपूर्ण गावाला धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT
सकाळीच घातला गोंधळ, अन् पाताळयंत्री रिनाने शेजाऱ्यांना ठरवलेलं दोषी
11 मे रोजी सकाळी मृत धीरेंद्र याची पत्नी रिनाने घरात एकच गोंधळ घातला आणि गावातील रहिवासी कीर्ती, तिचा मुलगा रवी आणि राजू यांनी मिळून तिच्या पतीची हत्या केल्याचा आरोप केला. तिने सुरुवातीला असा आरोप केला की, या लोकांशी आधी तिच्या पतीचं भांडण झालं होतं आणि आता त्यांनीच धीरेंद्रचा खून केला. याच आरोपानंतर पोलिसांनी रिनाच्या तक्रारीवरून तिघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले होते.
हे ही वाचा>> पुतण्यासोबत होते रिनाचे शारीरिक संबंध, काकीने केला काकासोबत भलताच कांड, शेजाऱ्यांवरच...
मोबाइल CDR मधून उघड झाले गुपित, काकीचा पुतण्याला 40 वेळा कॉल
तपासादरम्यान पोलिसांना संशय आल्यावर त्यांनी रिनाच्या मोबाइलचा कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) काढला. ज्यामध्ये 11 मे च्या रात्री रिना ही तिचा पुतण्या सतीश याच्याशी तब्बल 40 वेळा फोनवर बोलल्याचं समोर आलं. एवढेच नाही तर घरात रक्ताचे डागही आढळले, ज्यामुळे पोलिसांना प्रकरण संशयास्पद वाटू लागले.
पोलिसी खाक्या दाखवताच पुतण्याने सगळं सांगितलं खरं
पोलिसांचा दावा आहे की, सतीशला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने रिनासोबत त्याचे अनैतिक संबंध असल्याचे कबूल केले. एके दिवशी रिनाच्या पतीने म्हणजेच काकाने त्या दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. यानंतर, रिनाने सतीशसोबत मिळून पतीला बेदम मारहाण केली होती. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. यानंतर आपण या प्रकरणात अडकू नये यासाठी रिनाने एक वेगळाच बनाव रचला. ज्यानुसार तिने सकाळी पतीला शेजाऱ्यांनी ठार मारल्याचा कांगावा केला.
हे ही वाचा>> महिलेनं तब्बल 25 तरुणांशी केलं लग्न; नंतर पैसे घेऊन व्हायची फरार, बाईईई काय हा प्रकार...
हत्येनंतर आरोपी पाहत होते अश्लील व्हिडिओ
दरम्यान, पोलिसांनी सतीशचा मोबाइल जप्त केला तेव्हा त्यांना त्यात धक्कादायक गोष्टी आढळल्या. 11 मे ते 18 मे पर्यंत सतीशने अनेक अश्लील व्हिडिओ डाउनलोड केले होते. त्याच्या मोबाइलमधून पोलिसांना 2 डझनहून अधिक पॉर्न व्हिडिओ सापडले आहेत. हत्येनंतर रिनाने तिचा मोबाइल फोन तोडून तलावात फेकून दिला होता, जो आतापर्यंत सापडलेला नाही.
अनैतिक संबंध असल्याचे झाले सिद्ध, व्हिडिओमधून मिळाले महत्त्वाचे पुरावे
चौकशी दरम्यान पोलिसांना एक व्हिडिओ सापडला आहे ज्यामध्ये रिना आणि सतीश एकत्र असल्याचे दिसत आहेत. पोलिसांचा असा दावा आहे की हा व्हिडिओ त्यांच्यातील अनैतिक संबंध असल्याचे सिद्ध करण्यासाठी पुरेसा आहे.
निर्दोषांना लवकरच सोडण्यात येईल
अटक केलेल्या तीन निर्दोष लोकांना लवकरच तुरुंगातून सोडण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. एसीपी रणजित कुमार म्हणाले की, दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे आणि त्यांच्याविरुद्ध भक्कम पुरावे सापडले आहेत.
ADVERTISEMENT
