महिला डॉक्टरचे AI जनरेटेड अश्लील व्हिडिओ, नेमकं हॉस्पिटलमध्ये घडलं काय?

Satara Crime news : साताऱ्यातील कराडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन प्रतिष्ठीत महिला डॉक्टरांचे AI जनरेटेड अश्लील व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली आहे. यया व्हिडिओमागे डॉक्टरचा हात असल्याचे समजतंय. 

satara crime news ai deepfake videos women doctor incidence in karad

satara crime news ai deepfake videos women doctor incidence in karad

मुंबई तक

11 Jun 2025 (अपडेटेड: 12 Jun 2025, 01:00 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

महिला डॉक्टरांचे AI जरेटेड अश्लील व्हिडिओ

point

नेमकं प्रकरण काय?

satara crime news : तंत्रज्ञानाचा जेवढा फायदा आहे तेवढंच तंत्रज्ञान धोकादायक असू शकतं. तुम्ही म्हणत असाल की असं का बोलत आहात? पण हे सत्य आहे. कारण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी साध्य करता येतात. मात्र, याच तंत्रज्ञानामुळे एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचं काम केलं जाऊ शकतं. अशीच एक घटना साताऱ्यातील कराडमध्ये घडली आहे. दोन प्रतिष्ठीत महिला डॉक्टरांचे AI जनरेटेड अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले आहेत. या व्हिडिओमागे डॉक्टरचा हात असल्याचे समजतंय. 

हे वाचलं का?

हेही वाचा : सोनमने मारेकऱ्यांना केला इशारा अन् त्या सेकंदभरात राजाचा खेळ खल्लास, घटनास्थळी...

नेमकं प्रकरण काय? 

सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन नामांकित महिला डॉक्टरांचे AI जनरेटेड अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले आहे. संबंधित प्रकरणाची माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात लक्ष्य घालत प्रकरण हाताळण्यास सुरुवात केली आहे. 

संबंधित व्हिडिओ हे बाहेरच्या राज्यातून तयार करण्यात आले आहेत. पोलिसांच्या तपासातून समजलं की, AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्हिडिओ बनावट असल्याचे समोर आले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ नये, यासाठी पोलिसांनी संशयाच्या आधारे दोघांना आपल्या ताब्यात घेतलं आहे. आरोपी हे दुसरे तिसरे कोणीही नसून तिथले डॉक्टर असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. दरम्यान, तपास सुरू असताना अनेक तांत्रिक बाबी तपासल्या जातात. 

महिला डॉक्टरांनी पोलीस ठाण्यात केली तक्रार

कराड पोलिसांनी सांगितलं की, पोलीस ठाण्यात काही दिवसांआधी दोन महिला डॉक्टरांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन कराड पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. 'आयटी अॅक्ट' अंतर्गत गुन्हा दाखल केल्याने सायबरच्या माध्यमातून या व्हिडिओची माहिती मिळवली. हे व्हिडिओ कोणी टाकले याचा तपास सुरू करण्यात आला होता. हे व्हिडिओ पंजाबच्या विकास शर्माने केल्याचे उघड झाले आहे. या व्हिडिओमागे डॉक्टर राजीव शिंदे यांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा : गुरू आणि शुक्र ग्रह तब्बल 12 वर्षानंतर एकत्र येणार, 'या' राशीतील लोकांच्या आयुष्यात मोठा चमत्कार होणार

पैशांच्या गरजेपोटी विकास शर्माने हे AI जनरेटेड व्हिडिओ बनवले आहेत. मी जे सांगेन ते टास्क करावे लागतील, असे डॉक्टर राजीव शिंदे यांनी सांगितले. त्यावेळी त्यांनी विकासला काही मोबाईल नंबर पाठवले. त्या नंबरच्या आधारे विकासने महिलांचे बनवलेले अश्लील व्हिडिओ पाठवले. दरम्यान, विकास आणि राजेश शिंदेंचे मोबाईल पोलिसांनी जप्त केलेत. या घटनेचा  पुढील तपास पोलीस करत आहेत. 

    follow whatsapp