दगडाने ठेचलं आईचं डोकं, वडिलांचा गळाच चिरला अन् भावाला तर... नंतर मित्राला फोन केला आणि सांगितली 'ती' गोष्ट

दिल्लीच्या मैदानगढ परिसरातील खरक गावात एकाच कुटुंबातील तीन लोकांची निर्घृणपणे हत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण गाव हादरून गेलं आहे. नेमकं प्रकरण काय?

दगडाने ठेचलं आईचं डोकं, वडिलांचा गळाच चिरला अन भावाला तर...

दगडाने ठेचलं आईचं डोकं, वडिलांचा गळाच चिरला अन भावाला तर...

मुंबई तक

21 Aug 2025 (अपडेटेड: 21 Aug 2025, 01:00 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एकाच कुटुंबातील तीन लोकांची हत्या...

point

मुलानेच आई, वडील आणि मोठ्या भावाची हत्या केल्याचा संशय

Murder Case: दिल्लीच्या मैदानगढ परिसरातील खरक गावात एकाच कुटुंबातील तीन लोकांची निर्घृणपणे हत्या केल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण गाव हादरून गेलं आहे. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

खरक गावात घर क्र. 155 मध्ये राहणाऱ्या कुटुंबात घडलेल्या या घटनेमुळे स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. येथील रहिवासी असलेले प्रेम सिंग (48) एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होते. त्यांची पत्नी रजनी (45) गृहिणी असून त्यांचा मोठा मुलगा ऋतिक (24) शिक्षण पूर्ण करण्यासोबत नोकरीच्या शोधात होता. या कुटुंबात बुधवारी (20 जुलै) एक हृदयद्रावक घटना घडल्याचा पोलिसांना फोन आला. 

रक्ताच्या थारोळ्यात आढळले मृतदेह

पोलिसांना माहिती मिळताच ते तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यावेळी ग्राउंड फ्लोअरवर प्रेम सिंग आणि ऋतिक यांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात असल्याचं आढळलं. धारदार शस्त्राने त्यांच्या गळ्यावर निर्घृणपणे वार केल्याचं दिसून आलं. तसेच, पहिल्या मजल्यावर रजनीचा मृतदेह आढळला. तिच्या तोंडाला कापड बांधलेलं होते आणि तिच्या मानेवर खोल जखमा होत्या. त्या ठिकाणी सर्वत्र रक्त पसरलं होतं आणि जवळच रक्ताने माखलेला चाकू पोलिसांना आढळला.

हे ही वाचा: किचनच्या स्लॅबवर डोकं आपटलं अन्... किरकोळ वादातून केली पत्नीची हत्या! नंतर आईच्या मदतीने मृतदेह चादरीत गुंडाळून...

मुलानेच केली हत्या...

संबंधित कुटुंबात चार व्यक्ती राहत असून त्यातील तिघांची हत्या करण्यात आली होती. कुटुंबातील चौथी व्यक्ती म्हणजेच सिद्धार्थ (22) बद्दल काहीच माहिती समोर आली नाही. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय व्यक्त केला. घराचा तपास केला असता पोलिसांना सिद्धार्थचे मेडिकल प्रिस्क्रिप्शन आणि झोपेच्या गोळ्याही सापडल्या. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 12 वर्षांपासून सिद्धार्थ मानसिक आजारावर उपचार घेत होता आणि रागाच्या भरात तो बऱ्याचदा कुटुंबातील सदस्यांशी भांडत असायचा. इतकेच नव्हे, तर त्याला ड्रग्जचं व्यसन असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. 

मित्राला फोन केला आणि सांगितली 'ती' गोष्ट

घटनेनंतर, सिद्धार्थने त्याच्या मित्रांना फोन केला आणि म्हणाला, "'मी माझ्या कुटुंबियांना मारून टाकलं आहे, आता मी गावात राहणार नाही." हे ऐकून त्याच्या मित्रांना तो मस्करी करत असल्याचं वाटलं. पण सकाळी शेजारच्या एका मुलाला त्याच्या घराचा दरवाजा उघडा असल्याचं दिसलं आणि तेव्हा संपूर्ण सत्य बाहेर आलं. तिथे बसवलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिद्धार्थ घरात आंघोळ करताना दिसला. यामुळे हत्येनंतर त्याने स्वत:ला अगदी सामान्य दाखवण्यासाठी प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त केला.

हे ही वाचा: घरी सोडण्याच्या बहाण्याने प्रियकराने जंगलात नेलं अन् मित्रांसोबतच मिळून... हत्येनंतर मृतदेह नाल्यात...

घटनेचा तपास सुरू...

आश्चर्याची बाब म्हणजे इतक्या लोकांची हत्या झाल्यानंतर सुद्धा त्यावेळी शेजारच्यांना कोणताच ओरडण्याचा किंवा किंचाळण्याचा आवाज आला नाही. सिद्धार्थने हत्येपूर्वी या तिघांनाही झोपेच्या गोळ्या दिल्या होत्या का, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिस आता सिद्धार्थचा शोध घेत असून या प्रकरणातील संपूर्ण सत्य त्याच्या अटकेनंतरच समोर येईल.

    follow whatsapp