ठाणे मध्यवर्ती कारागृहात एका कैद्यानं केलेला प्रताप उघड झाला आहे. या घटनेमुळे जेल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.पोलिसांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार एका अंडरट्रायल कैद्याकडून एक मोबाइल जप्त करण्यात आला आहे. आपल्या चप्पलमध्ये या कैद्यानं फोन लपवला होता असं समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
30 डिसेंबर 2024 रोजी तुरुंगातील हवालदार बॅरेक क्रमांकाची तपासणी करत असताना ही बाब उघडकीस आली. ठाणे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल बोलताना सांगितलं की, कारागृहातील तीन नवीन विभागातील 200 कैद्यांची तपासणी सुरू आहे.
कैदी हेमंत पारसमल सेठिया (38) याची एक चप्पल जमिनीवर पडलेली आढळली, तर त्याची दुसरी चप्पल गायब होती. अधिकाऱ्यांनी झडती घेतल्यानंतर दुसरी चप्पल बॅरेकमध्येच दुसऱ्या ठिकाणी सापडली. पण अधिकाऱ्यांनी जेव्हा दोन्ही चप्पल हातात घेतल्या तेव्हा एक जड आणि एक हलकी वाटली. त्यामुळे अधिकाऱ्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
हे ही वाचा >>Sudarshan Ghule Beed : भाईगिरीचा नाद, नेत्यांचा 'शागीर्द', काळ्या स्कॉर्पिओवाला सुदर्शन घुले कोण? Santosh Deshmukh Case
तपास केल्यानंतर पोलिसांना बुटाच्या आत लपवलेला एक तुटलेल्या स्क्रीनचा मोबाईल सापडला. तो फोन तपासला असता, तो याच कैद्याचा होता असं आढळून आलं.
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार कैद्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने बॅरेकमध्ये मोबाईल फोन कसा ठेवला याचा तपास सुरू आहे. ते म्हणाले की, येथील काशिमीरा पोलिसात दाखल झालेल्या फौजदारी गुन्ह्यात अटक झाल्यानंतर आरोपी 30 सप्टेंबर 2023 पासून तुरुंगात होता.
ADVERTISEMENT











