Sudarshan Ghule Beed : भाईगिरीचा नाद, नेत्यांचा 'शागीर्द', काळ्या स्कॉर्पिओवाला सुदर्शन घुले कोण?
Sudarshan Ghule : सुदर्शन घुले याचा खून झाल्याच्या अफवा असून, संतोष देशमुख यांचं अपहरण करणारा आणि टॉर्चर करुन त्यांचा खून करणारा मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले. आरोपी संतोष घुले अद्याप फरार आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी

कोण आहे आरोपी सुदर्शन घुले?

सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या संपर्कात कसा आला?
कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणाऱ्या बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट पाहायला मिळाली. संतोष देशमुख यांचा खून आणि त्याच्याशीच संबंधीत असलेल्या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला पोलीस शोधू शकले नाही, तो स्वत: 20-22 दिवसानंतर शरण आला, त्यामुळे तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. त्यानंतर आता CID च्या रडारवर आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले. हा सुदर्शन घुले नेमका कोण? त्याची पार्श्वभूमी काय? हे जाणून घेणं महत्वाचं असणार आहे.
संतोष देशमुख यांचं अपहरण करणारा आणि टॉर्चर करुन त्यांचा खून करणारा मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले. आरोपी संतोष घुले अद्याप फरार आहे. सुदर्शन घुलेची पार्श्वभूमी आपण पाहिली तर, त्याचं वय 27 वर्ष असून, तो बीडमधील केज तालुक्यातील टाकळी गावचा आहे. त्याचं शिक्षण झालं जेमतेम सातवीपर्यंत. त्यानंतर सुदर्शनला छंद लागला भाईगिरीचा.
सुदर्शन कुठे राहतो? काय करतो?
राजकीय नेते मंडळींच्या सोबत राहायचं. नेते आणि पंटर सांगतील ती कामं करायची, त्यातूनच पैसे मिळवायचे. नेत्यांच्या सांगण्यावरुन एखाद्याला धमकावणं तसंच मारहाण आणि चोरी करण्याचेही आरोप त्याच्यावर असल्याचं गावातील केजमधील लोक सांगतात. म्हणजे कायदेशीर भाषेत तो गुन्हेगारच होता. सुदर्शन घुलेला भाईगिरीचा नाद, त्याचं स्वप्नही तसंच होतं. एकुलता एक असलेला सुदर्शन घुलेचं कुटुंब म्हणजे घरी फक्त त्याची आई. सुदर्शनच्या वडिलांचा मृत्यू झालेला असून, घरी 2 ते 4 चार एकर कोरडवाहू जमीन असल्याची माहिती आम्हाला बीडमधील सुत्रांकडून मिळाली.
हे ही वाचा >> Beed : बीडमध्ये पुन्हा तशीच घटना, माजी सरपंचाला उचललं, डांबून ठेवलं, पायात कुलूप असलेल्या अवस्थेत...
सुदर्शन घुलेचं घर पाहिलं, तर पत्र्याचं घर. पण त्याच्याकडे गाडी होती. काळ्या रंगाची स्कॉर्पिओ. ही स्कॉर्पिओ त्याच्याकडे कशी आली? कोणी दिली? याची माहिती आम्हाला मिळू शकली नाही. पण सुदर्शन हा केजमधील एका नेत्याच्या संपर्कात होता. याच नेत्याच्या सांगण्यावरुन तो कामं करायचा असं स्थानिक लोक सांगतात. हाच सुदर्शन घुले 6 डिसेंबरला मस्साजोग गावातील पवनचक्कीच्या प्रकल्पामध्ये प्रवेश करत असताना सुरक्षा रक्षकांसोबत त्याचा वाद झाला होता. यावेळी संतोष देशमुख आणि मस्साजोगचे काही गावकरी मध्यस्थी करण्यासाठी आले असता सुदर्शन घुले आणि टोळीचा त्यांच्यासोबतही वाद झाला. या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यातून आपला अपमान झाल्याचं घुले आणि त्याच्या साथीदारांना वाटलं अशी चर्चा आहे.