Kalwa Crime: चारित्र्याचा संशय अन् हत्येपूर्वी फोन कॉल, प्रमिला साळवी यांच्या हत्येमागची थरारक कहाणी

प्रशांत गोमाणे

04 Sep 2023 (अपडेटेड: 04 Sep 2023, 02:48 PM)

ठाण्याच्या कळवा परिसरात शुक्रवारी साळवी दाम्पत्याच्या हत्येची घटना घडली होती. या हत्याप्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून दिलीप साळवी यांनी प्रमिला साळवी यांची हत्या केल्याचा नवीन उलगडा झाला आहे.

thane kalawa crime husband killed wife gun shot salavi couple murder

thane kalawa crime husband killed wife gun shot salavi couple murder

follow google news

ठाण्याच्या कळवा परिसरात शुक्रवारी साळवी दाम्पत्याच्या हत्येची घटना घडली होती. या हत्याप्रकरणात खळबळजनक माहिती समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून दिलीप साळवी यांनी प्रमिला साळवी यांची हत्या केल्याचा नवीन उलगडा झाला आहे. तसेच हत्येपूर्वी प्रमिला यांनी त्यांच्या मुलाला बचावासाठी फोन देखील केला होता. मात्र मुलगा घटनास्थळी पोहोचण्यापुर्वीच त्यांची हत्या करण्यात आली होती. या संपूर्ण घटनाक्रमाची माहिती आता प्रसाद साळवी याने पोलिसांना दिली आहे. (thane kalwa crime husband killed wife gun shot salavi couple murder)

हे वाचलं का?

कळव्याचे बांधकाम व्यावसायिक दिलीप साळवी (58) यांनी बायको प्रमिला साळवी (52) यांच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला होता. या संशयातून दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. या वादातून दिलीप साळवी यांनी त्यांच्या लायसेन्स बंदूकीने प्रमिला यांच्यावर दोन राऊंड फायर करून त्यांची हत्या केली होती. या हत्येनंतर दिलीप साळवी यांचा मेंदूतील रक्तस्रावाने मृ्त्यू झाला होता. 1 सप्टेंबर 2023 रोजी 9 वाजून 59 मिनिटांनी कुंभारआळीतील यशवंत निवास बंगल्यात ही घटना घडली होती.

हे ही वाचा : Maratha Morcha : वटहुकूमवरून डिवचलं, ठाकरेंनी फडवणीसांचा अभ्यासच काढला, ‘ज्ञान इतकं तोकडं…’

दरम्यान प्रमिला साळवी यांनी स्वत:च्या बचावासाठी मुलगा प्रसाद साळवी याला फोन केला होता. ”तुझे पप्पा हातात रिव्हॉल्व्हर घेऊन मला मारण्यासाठी अंगावर येऊन जोरजोरात भांडण करीत आहेत”.प्रमिला यांनी ज्यावेळेस त्याला फोन केला होता, त्यावेळेस तो ऑफिसमध्ये होता. यावेळी त्याने क्षणाचाही विलंब न करता नॅशनल हॉटेलच्या मागील कुंभारआळीतील यशवंत निवास बंगलो या घराकडे बाईकवरून धाव घेतली होती. मात्र घरी पोहोचेपर्यंत प्रसादला खुपच उशीर झाला होता. कारण घरात प्रमिला साळवी या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, तर दिलीप साळवी निपचित पडले होते. या घटनेनतर प्रसादच्या पाठोपाठ त्याचे मित्रही घरात पोहोचले होते. त्यांनी लगेच दोघांना रूग्णालयात दाखल केले होते,मात्र तिथपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

ठाण्याचे माजी महापौर गणेश साळवी यांचे दिलीप साळवी हे मोठे बंधू आहेत. त्यांच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली आहे.

    follow whatsapp