Crime News: उत्तर प्रदेशातील उन्नावमधील अचलगंज येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील नाथाई सिंह गावात एका महिलेचा गंभीर अवस्थेत मृतदेह आढळला. पीडितेचा शेतातील घरात मृतदेह आढळला असून तो रक्ताने माखलेल्या अवस्थेत होता. मृत महिला जल निगमची कर्मचारी असल्याची माहिती आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं. पीडित महिलेवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
गावकऱ्यांच्या मते, मागील काही काळापासून संबंधित महिला आणि तिच्या पतीमध्ये सतत वाद होत होते. आता, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असल्याचं सांगितलं जात आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट्सनंतर महिलेसोबत नेमकं काय घडलं? हे उघडकीस येईल.
हे ही वाचा: मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी आणखी एक मेट्रो! पहिल्यांदाच शहरातील अंतर्गत भागांना जोडणार, 'इतक्या' स्थानकांचं कनेक्शन...
अर्धनग्न अवस्थेत पीडितेचा मृतदेह
महिलेचा पती नातेवाईकांना भेटायला गेला असल्याचं सांगितलं जात आहे. या जोडप्याला मुले नव्हती, त्यामुळे ती महिला त्यांच्या शेतातील घरात एकटीच राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. तसेच, तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा होत्या. आरोपीने पीडितेच्या डोक्यावर वार करून तिची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह असल्यामुळे गावकरी बलात्काराचा संशय व्यक्त करत आहेत.
हे ही वाचा: नाशिक : अडीच लाखांची लाच स्विकारताना रंगेहात पडकलं, सिन्नरचा नायब तहसीलदार ACB च्या जाळ्यात
गावकऱ्यांनी काय सांगितलं?
गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वी मृत महिलेचा पती त्याच्या घरी एका दुसऱ्या महिलेला घेऊन आला होता. त्यानंतर, पतीचं त्याच्या पत्नीसोबत मोठं भांडण झालं. सध्या, पीडितेच्या पतीने आपल्या पत्नीच्या हत्येसंदर्भात 3 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाचा तपास केला असून पोलीस आता या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून त्यांना पोस्टमॉर्टम रिपोर्टची प्रतिक्षा आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, महिलेचा मृतदेह मिळाला असून तिच्या पतीने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आता या प्रकरणाचा अधिक तपास केला जात असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT











