राजकीय पक्षाच्या नेत्यावर महिलेसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप! थेट रॉडने प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला अन्...

पीडितेच्या म्हणण्यानुसार, किरकोळ कारणावरून आरोपी नेत्याने आधी तिला जबर मारहाण केली आणि नंतर तिच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले.

 थेट रॉडने प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला अन्...

थेट रॉडने प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला अन्...

मुंबई तक

• 04:58 PM • 06 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

राजकीय पक्षाच्या नेत्यावर महिलेसोबत घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप!

point

थेट रॉडने प्रायव्हेट पार्टवर हल्ला केला अन्...

Crime News: उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे नीलम नावाच्या एका वृद्ध महिलेने समाजवादी पार्टी पक्षाच्या फूलचंद यादव या नेत्यावर गंभीर आरोप केल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेच्या म्हणण्यानुसार, किरकोळ कारणावरून आरोपी नेत्याने आधी तिला जबर मारहाण केली आणि नंतर तिच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार केले. इतकेच नव्हे तर, आरोपीने महिलेच्या गुप्तांगात रॉड घातला आणि तिला गंभीर अवस्थेत सोडून फरार झाल्याचा पीडितेने आरोप केला. नेमकं प्रकरण काय?

हे वाचलं का?

भाजप कार्यकर्त्या असल्याचा दावा   

संबंधित घटना बस्ती जिल्ह्यातील रुदौली पोलीस स्टेशन परिसरात घडल्याची माहिती आहे. येथे राहणाऱ्या एका नीलम नावाच्या वृद्ध महिलेने तक्रार करत सांगितलं की, भाजप पक्षातील नेत्यांशी तिच्या कुटुंबियांचे चांगले संबंध आहेत. तसेच, पीडिता आणि तिचा मुलगा भाजप पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा देखील त्यांनी दावा केला. खरं तर, ज्या आरोपीने महिलेला बेदम मारहाण केली, तो फूलचंद्र यादव समाजवादी पक्षाशी (सपा) निगडित आहे आणि स्थानिक सपा आमदार राजेंद्र चौधरी यांच्या जवळचा आहे. म्हणूनच तक्रार केल्यानंतर पोलीस आरोपी तरुणावर कारवाई करण्यास कचरत असल्याचा आरोप पीडितेने केला.

हे ही वाचा: मुंबईची खबर: दीड तासांचा प्रवास आता केवळ 15 मिनिटांत... 'या' मार्गाला जोडलं जाणार ठाणे-बोरीवली ट्विन टनल!

रॉडने गुप्तांगावर हल्ला   

महिलेचा असा आरोप आहे की फूलचंद्र यादव आणि तिच्या साथीदारांनी आधी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि नंतर काठ्यांनी तिला बेदम मारहाण केली. दरम्यान, पीडितेवर कुऱ्हाडीने हल्ला देखील करण्यात आला आणि यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. पीडितेच्या आरोपानुसार, आरोपीने महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, त्याने पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. 

हे ही वाचा: सुरेश रैना आणि शिखर धवनला ईडाचा मोठा दणका, 11 कोटींची संपत्ती जप्त, नेमकं प्रकरण काय?

आरोपी नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल 

महिलेने तक्रार करताना सांगितलं की, घटनेच्या वेळी घरात कोणीच नव्हतं, त्यामुळे ती बराच वेळ रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडून राहिली होती. यानंतर, पीडितेचा मुलगा संजय घरी परतल्यानंतर पीडितेला जखमी अवस्थेत स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी तिला पोलिस केस म्हणत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्याचा सल्ला दिला. आता पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी नेत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

    follow whatsapp