आईनेच मुलाच्या हत्येसाठी दिली 6 लाख रुपयांची सुपारी! अखेर, पोलिसांना मृतदेह आढळला अन्... नेमकं काय घडलं?

एका आईनेच आपल्या मुलाच्या हत्येचा कट रचला आणि सुपारी देऊन मुलाची हत्या घडवून आणली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नातेसंबंधांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

आईनेच मुलाच्या हत्येसाठी दिली 6 लाख रुपयांची सुपारी...

आईनेच मुलाच्या हत्येसाठी दिली 6 लाख रुपयांची सुपारी...

मुंबई तक

• 09:00 AM • 17 Nov 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

आईनेच मुलाच्या हत्येसाठी दिली 6 लाख रुपयांची सुपारी!

point

अखेर, पोलिसांना मृतदेह आढळला अन्...

Crime News: आंध्र प्रदेशातून नातेसंबंधांना काळीमा फासणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका आईनेच आपल्या मुलाच्या हत्येचा कट रचला आणि सुपारी देऊन मुलाची हत्या घडवून आणली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून नातेसंबंधांवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. सध्या, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली? याबाबत सविस्तर जाणून घ्या.

हे वाचलं का?

मुलाच्या दारूच्या व्यसनामुळे अतिशय वैतागली... 

पोलिसांनी एका महिलेला तिच्याच मुलाच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षीय श्यामला नावाच्या महिलेने तिच्या 22 वर्षीय जयप्रकाश रेड्डी नावाच्या मुलाला मारून टाकण्यासाठी 6 लाख रुपये देऊन एका कॉन्ट्रॅक्ट किलर टोळीला कामावर ठेवलं होतं. जयप्रकाश हा एमबीएचा विद्यार्थी होता आणि काही काळापूर्वी त्याला दारूचं व्यसन लागले होते. तो त्याच्या आईकडे दारूसाठी सतत पैसे मागायचा. यामुळे श्यामला आपल्या मुलाच्या वैगण्याला अतिशय वैतागली होती.

हे ही वाचा: आईसमोरच मुलाची निर्घृण हत्या! आधी हात-पाय बांधले, नंतर गळा दाबून... नेमकं प्रकरण काय?

6 लाख रुपयांची सुपारी  

पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत सांगितलं की, श्यामलाने तिच्या कुटुंबियांच्या ओळखीचा असलेल्या महेश नावाच्या शेतमजूरी करणाऱ्या व्यक्तीला तिच्या मुलाला मारण्यास सांगितलं. तिने त्याला 50,000 रुपये अडवान्स्ड दिले. त्यानंतर, 7 नोव्हेंबर रोजी जयप्रकाशचा मुंबई-चेन्नई महामार्गालगत गुल्लापल्ली येथील एका दारूच्या दुकानाजवळ आढळला.

हे ही वाचा: 16 वर्षीय तरुणीला कॅबमध्ये बसवून हॉटेलमध्ये नेलं! पण, कॅब चालकाला आरोपीवर संशय आला अन् थेट...

पोलिसांनी आणलं सत्य उघडकीस  

सुरुवातीपासून हा मृत्यू संशयास्पद असल्याचं मानलं गेलं, फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथक तैनात केल्यानंतर तपासाला गती मिळाली. त्यानंतर पीडित तरुणाची ओळख पटवण्यात आली. निरीक्षक गोपाल रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेशच्या मोबाईल फोनवरून श्यामलाला आलेल्या कॉलवरून घटनेचं सत्य उघडकीस आलं. या घटनेत महेशसह त्याचे साथीदार सुद्धा सहभागी असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात श्याम, महेश आणि इतर सहा जणांना अटक केली.

    follow whatsapp