आईसमोरच मुलाची निर्घृण हत्या! आधी हात-पाय बांधले, नंतर गळा दाबून... नेमकं प्रकरण काय?
आरोपींनी मिळून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. . घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आईसमोरच मुलाची निर्घृण हत्या!
आधी हात-पाय बांधले, नंतर गळा दाबून...
Crime News: उत्तर प्रदेशातील झाशी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. तीन आरोपींनी मिळून एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याचं सांगितलं जात आहे. प्रकरणातील मृताचं 45 वर्षीय मृताचं नाव रमेश प्रजापती उर्फ कल्लू असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या.
जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील अंजनी माता मंदिराजवळ ही घटना घडली. या परिसरात राहणारा रमेश प्रजापती हा आपल्या कुटुंबियांचं पालनपोषण करण्यासाठी मजूर म्हणून काम करत होता. मंगळवारी रात्री तीन अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्या घरात घुसून रमेशची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर, आरोपी घरातून फरार झाले. दरम्यान, रमेशच्या घरात त्याच्या मोठ्या भावाच्या लग्नाची तयारी सुरू असल्याचं वृत्त आहे. घरात आनंदाचं वातावरण होते, परंतु अचानक झालेल्या या दुःखद घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला.
पीडित तरुणाच्या आईचा जबाब
पोलिसांच्या चौकशीत रमेशची आई म्हणाली की, "रात्री तीन अज्ञात लोक अचानक घरात घुसले. त्यांनी आपापसात काही बोलणं केलं आणि नंतर त्यांनी रमेशचे हातपाय बांधून माझ्या मुलाचा विजेच्या तारेने गळा दाबायला सुरुवात केली. त्यावेळी, मी ओरडत होते, पण कोणीही माझं ऐकलं नाही."
हे ही वाचा: 16 वर्षीय तरुणीला कॅबमध्ये बसवून हॉटेलमध्ये नेलं! पण, कॅब चालकाला आरोपीवर संशय आला अन् थेट...
या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोध घेण्यास सुरूवात केली. फॉरेन्सिक टीम सुद्धा घटनास्थळी पोहोचून तेथील पुरावे गोळा करण्यात आले. सुरुवातीच्या तपासात रमेशची हत्या जुन्या वैमनस्यातून किंवा आर्थिक वादातून झाल्याचं दिसून येत आहे. अद्याप कोणत्याही संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नाही.










