शेतात एकट्या राहणाऱ्या 90 वर्षीय वृद्धेवर सामूहिक अत्याचार, नराधमांची माहिती देणाऱ्यास 10 हजारांचे बक्षीस
Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका 90 वर्षीय वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (5 मार्च) रात्री घडली, जेव्हा ही वृद्ध महिला आपल्या शेतात असलेल्या एका झोपडीत एकटीच होती. याच दरम्यान चारजण तिथे घुसले आणि त्यांनी हे कृत्य केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
शेतात एकट्या राहणाऱ्या 90 वर्षीय वृद्धेवर सामूहिक अत्याचार
नराधमांची माहिती देणाऱ्यास 10 हजारांचे बक्षीस
Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका 90 वर्षीय वृद्ध महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी (5 मार्च) रात्री घडली, जेव्हा ही वृद्ध महिला आपल्या शेतात असलेल्या एका झोपडीत एकटीच होती. याच दरम्यान चारजण तिथे घुसले आणि त्यांनी हे कृत्य केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी चक्रं फिरवली आहेत. मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील ही घटना आहे.
हे ही वाचा : 'तु मला आवडतेस', म्हणत जालन्यात सासऱ्याने सुनेला मागून मिठीत धरले, नंतर खाली पाडून...
वृद्धेने मुलीला दिली माहिती
या घटनेनंतर पीडित वृद्ध महिलेने दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मुलीला याबद्दल माहिती दिली. पीडितेची मुलगी शेजारच्याच गावात राहते. माहिती मिळताच तिने तातडीने आईला गाठले आणि तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यादरम्यान वृद्धेला गंभीर जखमा झाल्या आहेत, मात्र सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तातडीने गुन्हा दाखल केला असून तपास पथके रवाना केली आहेत.
सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल
पोलिसांनी सांगितले की, सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. या पथकाचे नेतृत्व अतिरिक्त पोलीस अधीक्षक करत आहेत. याशिवाय, आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन वेगळी पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. सध्या पोलीस आसपासच्या परिसरातील संशयास्पद लोकांची चौकशी करत असून ठिकठिकाणी छापेमारी सुरू आहे.










