घरात बहिणीला चाकूने भोसकले अन् नंतर आईवरही सपासप केले वार, आयटी इंजिनीअर का बनला हैवान?

मुंबई तक

Crime News : आयटी कंपनीत कामाला असलेल्या एका जुळ्या भावाने आपल्या बहिणीची चाकूने भोसकून हत्या केली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपीने आपल्या आईवरदेखील जीवघेणा हल्ला केला आहे. सध्या आई रुग्णालयात असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. होळीचा सण साजरा करण्यासाठी घरी आला असता त्याने हे कृत्य केले. किरकोळ वादातून झालेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

घरात बहिणीला चाकूने भोसकले अन् नंतर आईवरही सपासप केले वार

point

आयटी इंजिनीअर का बनला हैवान?

Crime News : आयटी कंपनीत कामाला असलेल्या एका जुळ्या भावाने आपल्या बहिणीची चाकूने भोसकून हत्या केली आहे. एवढ्यावरच न थांबता आरोपीने आपल्या आईवरदेखील जीवघेणा हल्ला केला आहे. सध्या आई रुग्णालयात असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. होळीचा सण साजरा करण्यासाठी घरी आला असता त्याने हे कृत्य केले. किरकोळ वादातून झालेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद परिसरातील ही घटना आहे. 

हे ही वाचा : रेकॉर्डिंग डिलिट केल्याने मुलगा बनला हैवान, आईच्या तोंडात बनियनचा बोळा करुन कोंबला अन्...बदलापूरात धक्कादायक घटना

किरकोळ वादातून हत्या

मिळालेल्या माहितीनुसार, नीलिमा नावाची महिला एका आरोग्य विमा कंपनीत काम करते. त्यांची जुळी मुले, हार्दिक आणि हिमा शिखा, गुरुग्राममधील एका आयटी कंपनीत नोकरीला होती. दोघेही होळीसाठी घरी आले होते आणि शुक्रवारी पुन्हा गुरुग्रामला जाण्याच्या तयारीत होते. शुक्रवारी आई कामावर गेल्यानंतर हार्दिक आणि हिमा शिखा घरात एकटेच होते. यावेळी त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला आणि रागाच्या भरात हार्दिकने हिमा शिखावर चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बहिणीला सोडून तो तिथेच थांबला नाही.

ऑफिसमध्ये जाऊन आईला घेऊन आला

बहिणीची हत्या केल्यानंतर हार्दिक आपल्या आईच्या कार्यालयात पोहोचला आणि काहीतरी बहाणा करून त्यांना घरी घेऊन आला. आईने घरात पाऊल टाकताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलीला पाहून किंकाळी फोडली. त्याच वेळी हार्दिकने आईवरही चाकूने वार करून त्यांना गंभीर जखमी केले आणि स्वतःच्या कारमधून घटनास्थळावरून पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा ऐकून धाव घेतली आणि जखमी मायलेकींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी हिमा शिखाला मृत घोषित केले, तर नीलिमा यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp