बुरखा शॉप चालवणाऱ्या अल्पवयीन मुलीवर गँगरेप! शेजाऱ्याने व्हिडीओ पोस्ट केला, वडिलांनी केली CM पोर्टलवर न्यायाची मागणी!

Minor Girl Rape Case :  उत्तरप्रदेशच्या बरेलीत एक संतापजनक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बरेलीच्या भोजीपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी बलात्कार केला.

प्रतिकात्मक चित्र.

प्रतिकात्मक चित्र.

मुंबई तक

15 Aug 2025 (अपडेटेड: 15 Aug 2025, 04:24 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीवर नराधमांनी केला सामूहिक बलात्कार

point

शेजाऱ्याने व्हिडीओ बनवून व्हायरल केला

point

मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर पोलिसांना आली जाग

Minor Girl Rape Case :  उत्तरप्रदेशच्या बरेलीत एक संतापजनक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बरेलीच्या भोजीपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर नराधमांनी बलात्कार केला. गावतीलच शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलांनी मुलीवर अत्याचार केला, असा आरोप आहे. पोलिसांनी याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे पीडितेच्या वडिलांनी पोलिसांवर कर्तव्यात कसूर केल्याचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप केला आहे. तसच याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे लेखी तक्रारही केली आहे.

हे वाचलं का?

त्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांचं त्याच गावात बुर्का शॉप आहे. ही धक्कादायक घटना 3 ऑगस्टला घडली. गावातील दोन मुलांनी अल्पवयीन मुलीवर गँगरेप केला. शेजारच्याने या घटनेचा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांना या संतापजनक घटनेबद्दल समजलं. त्यानंतर पीडितेचे वडिल तातडीनं पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. पण त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. पोलिसांनी गँगरेपचा गुन्हा न दाखल करता फक्त छेडछाड केल्याची तक्रार नोंदवली, असा आरोप केला जात आहे. तसच व्हिडीओही डिलिट केल्याचं समजते.

हे ही वाचा >> Pm Narendra Modi Speech : 'दहशतवाद्यांना पोसणारे दहशतवादीच अन्...' ऑपरेशन सिंदूरबाबत काय म्हणाले पंतप्रधान?

शेजाऱ्याने व्हिडीओ बनवून व्हायरल केला

पीडितेच्या वडिलांचं म्हणणं आहे की, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरही पोलिसांनी कठोर कारवाई केली नाही. आरोपींना तातडीनं अटकही केली नाही. तसच त्यांची मेडिकल टेस्टही केली नाही. त्यामुळे कुटुंबियांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेतल्यानंतर पोलिसांना आली जाग

पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही, तेव्हा पीडितेच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री पोर्टलवर न्यायाची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी 10 ऑगस्ट रोजी पीडितेची मेडिकल टेस्ट केली आणि याप्रकरणाचा तपास सुरु केला. पोलीस अधिकारी आशुतोष शिवम यांनी म्हटलं की, याप्रकरणी कारवाई केली जात आहे. मेडिकल रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. 

हे ही वाचा >> Pm Modi Speech : महागाई लवकरच होणार कमी, जीएसटीच्या दराबाबत मोठा निर्णय, 'या' दिवाळीत मोठी भेट मिळणार

    follow whatsapp