Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे दोन जीवांचं मिलन होण्याआधी क्षुल्लक करणावरुन अनर्थ घडला. या घटनेस नवरा मुलगा जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. नवऱ्या मुलाने थेट आपल्या होणाऱ्या पत्नीवर गोळीबार केल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे. नवरा मुलगा आणि नवरी मुलगी यांच्या साखरपुड्यादरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. या गोळीबारात नवरी मुलगी बेशुद्ध आहे. तरुणीने तरुणाला या बंधनासाठी नकार दिल्याने गोळीबार केल्याचं कारण समोर आलं आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : शुभमन गिलच्या कर्णधारपदानंतर... रवींद्र जडेजा म्हणाला, मला व्हायचंय...
एकूण काय होता घटनाक्रम?
ही घटना बुधवारी दुपारी 2 वाजून 30 मिनिटानंतर घडली आहे. जागीर ब्लॉक परिसरातील सागमई गावातील रहिवासी राजेश राजपूत यांचा मुलगा अमुखचा विवाह भोगाव येथील नागला रामसहायस्थित असणाऱ्या रहिवासी रघुवीर यांची मुलगी दीशिखासोबत ठरलं होतं. बुधवारी विवाहस्थळ असणाऱ्या शगुन मॅरेज होममध्ये समारंभासाठी पोहोचले होते.
अशावेळी एका बाजूला नवरी मुलगी आणि दुसऱ्या बाजूला नवरा मुलगा बसला होता. अशावेळी नवरी मुलीने नवऱ्या मुलाला विवाहासाठी पसंत केलं नाही. तिने या विवाहाला नकार दिला. अशा क्षणी नवऱ्या मुलाने क्षणाचाही विलंब न करता अशा करणावरुन नवरी मुलीच्या डोक्यात गोळीबार केला. यावेळी समारंभाच्या स्थळी सर्वांचीच घाबरघुंडी उडाली. काही लोक त्या ठिकाणाहून निसटले.
संबंधत घटनेची माहिती पोलिसांना कळताच घटनास्थळी अनेक लोक आले. मात्र, अशावेळी नवऱ्या मुलासोबत आलेले लोक आणि गोळीबार करणाऱ्या हल्लेखोर घटनास्थळावरुन धाव घेत पळ काढला. घटनास्थळी गोळीबार करणाऱ्यांच्या गाड्या उभ्या होत्या. त्या गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहेत.
हेही वाचा : लग्नाच्यावेळी पत्नीच्या पोटात होतं बॉयफ्रेंडचं बाळ, सत्य समजताच पतीचा गेला जीव
दरम्यान, तरुणी नवरी मुलीच्या डोक्याला गोळी घासली असून तिला नजीकच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेविरोधात पोलिसांनी मुलींवर गोळीबार करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितला आहे. त्यानंतर संबंधित आरोपीवर कारवाई करता येईल, असेही पोलीस म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
