उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यात २५ मे रोजी एका 65 वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या घरात आढळून आल. माहिती मिळताच, पोलिसांनी तिथे पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला. यावेळी महिलेचे कपडे विस्कटलेले होते. आता पोलिसांनी या प्रकरणाबाबत खळबळजनक माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
खरं तर, 65 वर्षीय महिलेच्या प्रियकरानेच तिची हत्या केली होती. प्रियकर महिलेसोबत सेक्स करू इच्छित होता. पण महिला नकार देत होती. यादरम्यान, प्रियकराने रागावून महिलेची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराचे वय 45 वर्षे आहे, तर महिलेचे वय 65 वर्षे होते. आरोपी प्रियकर दूधवाला आहे. त्याचे आणि महिलेचे संबंध होते.
कौशांबीमध्ये काय घडले?
ही घटना सराई अकिल पोलीस ठाण्यातील बराई गावातील आहे. येथे 25 मे रोजी 65 वर्षीय महिलेच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. महिलेचा मृतदेह घरात पडला होता. त्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. महिलेच्या गळ्यात कापड बांधल्याच्या खुणा होत्या. तर महिलेचे कपडे विस्कटलेले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तपासादरम्यान, दिनेश कुमार नावाचा व्यक्ती पोलिसांच्या नजरेत आला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर समोर आलेल्या कहाणीने पोलिसांनाही धक्का बसला.
65 वर्षीय महिलेचे 45 वर्षीय दिनेशसोबत शारीरिक संबंध
मृत महिलेचा नवरा लग्नाच्या 6-7 वर्षांनी तिला सोडून गेला होता. ती गावात एकटीच राहत होती. दिनेश महिलेच्या घरी दूध पोहोचवत असे. दरम्यान, महिला आणि दिनेश एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांच्यात प्रेम निर्माण झाले आणि त्यांच्यात संबंध निर्माण होऊ लागले. दोघेही वारंवार मोबाइलवर बोलू लागले. त्यानंतर दोघांमध्ये अनेकदा शारीरिक संबंधही झाले होते.
दिनेशने महिलेची हत्या का केली?
पोलीस चौकशीत आरोपीने सांगितले की, तो 25 मे रोजी रात्री 10 वाजता महिलेशी बोलला आणि तो महिलेच्या घरी गेला. यादरम्यान त्याने महिलेला सेक्स करण्यास सांगितले. पण महिलेने सांगितले की, तिची तब्येत ठीक नाही. दिनेशला वाटले की ती बहाणे करत आहे. अशा परिस्थितीत त्याने तिला जबरदस्ती करायला सुरुवात केली. यादरम्यान, महिलेने विरोध करायला सुरुवात केली आणि महिलेने त्याला ढकलून दिलं. यानंतर दिनेशला राग आला आणि त्याने तिचा गळा दाबून खून केला. पोलिसांनी मोबाइल रेकॉर्ड तपासले आणि तपासानंतर आरोपीला पकडले.
एएसपी राजेश सिंह यांनी या संपूर्ण प्रकरणावर सांगितले की, महिलेचे त्याच गावातील दिनेशशी संबंध होते. दिनेश तिच्या घरी दूध पोहोचवत असे. घटनेच्या दिवशी महिलेच्या फोनवरून बोलणं झाल्यानंतर दिनेश तिच्या घरी पोहोचला होता. त्याने सेक्स करण्याचा प्रयत्न केला होता. पण महिलेने नकार दिला होता. यामुळे महिलेची हत्या करण्यात आली. आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
