दिवाळी दिवशीच प्रायव्हेट पार्टजवळ फटाके फोडले, अन् ‘त्याचा’ जीवच…

मुंबई तक

13 Nov 2023 (अपडेटेड: 13 Nov 2023, 01:07 PM)

दिवळी दिवशी फटाके उडवत असताना काही नराधमांनी एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टजवळ फटाके फोडले, त्यामुळे त्या व्यक्तीच्या शरीरातून प्रचंड रक्तस्त्राव झाला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजचही आता प्रचंड व्हायरल झाले असून संबंधित आरोपी फरार झाल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Uttar Pradesh man died after bursting firecrackers near his private part

Uttar Pradesh man died after bursting firecrackers near his private part

follow google news

UP Crime: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये फटाक्यांमुळे एका 40 वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. फटाक्यांसाठी बनवलेल्या ट्यूबमध्ये फटाक्यांची (firecrackers) दारु भरुन त्या ट्यूबचा त्याच्या प्रायव्हेट पार्टजवळ (Private Part) स्फोट करण्यात आला. त्यामध्ये तो माणूस जखमी होऊन कोसळला होता. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

हे वाचलं का?

घटनेचा व्हिडीओ व्हायरल

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी गाझियाबादच्या लिंक रोड पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले आहे. घनश्याम शाळेजवळ काही तरुण उभे असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावेळी तेथून दोन व्यक्ती हातात पिशव्या घेऊन जात होते. त्यानंतर शाळेजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या त्याच तरुणांपैकी एका तरुणाने तेथून जाणाऱ्या एका व्यक्तीच्या मागून प्रायव्हेट पार्टजवळ फटाक्यांसाठी बनवलेल्या ट्यूबचा स्फोट केला. हा स्फोट झाल्यानंतर मात्र पीडित व्यक्ती अचानक जमिनीवर कोसळली, आणि बेशुद्ध पडली.

हे ही वाचा>> Mumbai Crime : एनसीबी कार्यालयाच्या इमारतीतच तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

फटाक्याच्या ट्यूबचा स्फोट

फटाक्याच्या ट्यूबचा स्फोट करुन त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव ​​अफजल अन्सारी होते. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत अन्सारीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्यामुळे त्याला तात्काळ एमएमजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या प्रायव्हेट पार्टजवळ फटाक्यांच्या दारुची ट्यूब फोडणाऱ्या तरुणाचे नाव प्रदीप असून सध्या तो फरार झाला आहे. ज्या आरोपीनी फटाके वाजवल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला होता, त्यातील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. तर काही जणांचा पोलीस शोध घेत आहेत. सध्या पोलीस या घटनेचा अनेक अंगांनी तपास करत आहेत.

    follow whatsapp