बॉयफ्रेंडचा शब्द पडू दिला नाही, शिक्षिकेनं नवऱ्याला संपवलं; काय घडलं?

मुंबई तक

• 09:56 AM • 18 Jun 2026

एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. येथे एका शिक्षिकेने आपल्या प्रियकराच्या सांगण्यावरुन पतीची चाकूने भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

बॉयफ्रेंडचा शब्द पडू दिला नाही

point

शिक्षिकेनं नवऱ्याला संपवलं

point

काय घडलं?

Crime News : एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. येथे एका शिक्षिकेने आपल्या प्रियकराच्या सांगण्यावरुन पतीची चाकूने भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे. मनीष गुप्ता असे मृत व्यावसायिकाचे नाव असून, तो आधी किराणा बाजारात दलाल म्हणून काम करायचा. 5 जून रोजी मनीषने त्याची पत्नी निहारिका गुप्ता हिला फोनवर तिच्या प्रियकराशी बोलताना रंगेहात पकडले होते. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. या वादादरम्यान निहारिकाने घरात असलेल्या चाकूने मनीषवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेत मनीष गंभीर जखमी झाला होता. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ही घटना आहे.

हे वाचलं का?

'आजच नवऱ्याचा गेम करुन टाक'

या घटनेनंतर मनीषला अत्यंत गंभीर अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती अधिकच बिघडल्यामुळे त्याला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे तब्बल 11 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मंगळवारी उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. फिर्यादी आणि मनीषच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, घटनेच्या वेळी निहारिका ज्या व्यक्तीसोबत फोनवर बोलत होती, त्यानेच तिला "आजच तुझ्या नवऱ्याचा गेम करून टाक," अशी चिथावणी दिली होती, ज्यानंतर तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

हे ही वाचा : गोड बोलून प्रेयसीला नेलं अन्..., रेल्वेच्या तिकीटावरुन हत्येचा उलगडा

प्रियकराचा शोध सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस चौकशीदरम्यान आरोपी पत्नी निहारिकाने आपला गुन्हा कबूल केला आहे. तिने मान्य केले की वादाच्या भरात तिनेच पतीवर चाकूने हल्ला केला होता. पोलिसांनी याप्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपी निहारिकाला अटक केली असून, तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पोलीस आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि तिला फोनवरून चिथावणी देणाऱ्या तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.

हे ही वाचा : विद्यार्थी परीक्षेत नापास, 11 एक्सपायर्ड गोळ्या खाल्ल्या अन्..

6 वर्षांचा चिमुरडा पोरका

मनीषचे वडील रामकिशोर गुप्ता यांनी अत्यंत सुन्न करणाऱ्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, मनीष आणि निहारिकाचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबाने संमती देऊन 2017 मध्ये मोठ्या थाटामाटात त्यांचा विवाह लावून दिला होता. निहारिका ही शिक्षिका आहे. या दोघांना रियांश नावाचा सहा वर्षांचा मुलगा देखील आहे. मात्र, पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे आणि एका क्षणाच्या रागामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा असा दुर्दैवी अंत झाला असून, 6 वर्षांचा चिमुरडा आता पोरका झाला आहे.