Vaishanavi Hagawane Case : ग्रामीण पुण्यातील मुळशी तालुक्यातील हगवणे कुटुंबाने पुण्याच्या संस्कृतीला काळीमा फासली आहे. वैष्णवीचा छळ करून तिला मारहाण केली आणि तिला आत्महत्येस भाग पाडल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणात नवनवीन ट्विस्ट निर्माण होत आहेत. या प्रकरणाचे अनेक धागेदोरे समोर येत आहेत. दरम्यान काही महिन्यांपूर्वीं गौतमीला बैलाच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलला बैलासमोर नाचवलं होते. वैष्णवीच्या मृत्यूनंतर अनेक लोक आता याविषयी चर्चा करताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Tri Ekadash Yog 2025: 26 मे 2025 रोजी नशीब उघडणार, शनी-बुधाची युतीमुळे 3 राशींना मिळेल पैशाचं घबाड!
बैलाच्या वाढदिवसाला गौतमी पाटीलला नाचवणारे हगवणे
एप्रिल 2023 मध्ये मुळशी तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गौतमी पाटीलने स्टेजवर बैलासमोर नृत्य केलं होतं. अशावेळी गौतमीच्या समोर बैल बांधलेला होता. फोटो पाहिला तर कळेल हा बैलाच्या वाढदिवसाचा क्षण आहे. या कार्यक्रमासाठी हगवणे कुटुंबाने मोठ्या प्रमाणात पैशांची उधळपट्टी केली होती. 'युवा मंच'च्या नेतृत्वाखाली त्यांनी असले प्रताप केले होते. अशातच आता वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर या हगवणेंच्या कृत्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
हुंड्यासाठी मारहाण करणाऱ्या हगवणे कुटुंबाने एका जनावराच्या वाढदिवशी पैशांची उधळपट्टी केली. पण त्यांना घरातील सून सांभाळता आली नाही. हुंड्यासाठी मुलीवर अन्याय अत्याचार केला आणि दुसऱ्या बाजूला बैलाच्या वाढदिवशी पैसा उधळला. मध्यंतरी बैलाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत होता. एकाबाजूला हुंड्यासाठी आपल्या घरातील लक्ष्मीला मारहाण केली. तर दुसरीकडे बैलाच्या वाढदिवसानिमित्त पैसा बक्कळ पैसाही उडवला. या हगवणेंच्या कृत्याने तालुका आणि राज्यात संतापाची लाट आहे.
आरोपी पोलिसांच्या ताब्यात
दरम्यान, वैष्णवी हगवणे प्रकरणात शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा या गजाआड आहेत. दरम्यान, या प्रकरणाती आरोपी असणारे सासरे राजेंद्र हगवणे यांनाही अटक झाली आहे. वैष्णवीचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातून तिच्या वडिलांनी आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली जावी अशी मागणी केली आहे.
हेही वाचा : Extra Marrital Affairs : पत्नीसोबत प्रियकराला नवऱ्यानं पकडलं रंगेहाथ, पोलीस ठाण्यात जाताच म्हणाली मला...
वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं बाळ आता वैष्णवीच्या आई वडिलांकडे आहे. सोशल मीडियावर त्या बाळाचा आणि वैष्णवीच्या आईचा फोटो व्हायरल होत आहे. बाळाच्या रुपात वैष्णवीला पाहत असल्याचं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे.
ADVERTISEMENT
