घोर कलियुग, वहिनीचा जडला दीरावर जीव, दोघेही लपून छपून भेटायचे, नंतर सोनं-नाणं सारंच लुटून भूर्रर्रर्र..

Viral News : दीर-भाऊजयीचं नातं म्हणजे भाऊ बहिणीप्रमाणे असतं, पण याच नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहित महिलेनं आपल्या दीरासोबत पळून जाऊन विवाह केल्याने परिसरात खळबळ उडाल्याचं चित्र आहे.

Viral News

Viral News

मुंबई तक

• 02:45 PM • 07 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

दीर-वहिनीच्या अफेयरबाबत नवऱ्याला समजलं....

point

बायको आणि भाऊ दोघेही गायब झाल्याने नवऱ्याला मोठा धक्का 

Viral News : दीर-भाऊजयीचं नातं म्हणजे भाऊ बहिणीप्रमाणे असतं, पण याच नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. एका विवाहित महिलेनं आपल्या दीरासोबत पळून जाऊन विवाह केल्याने परिसरात खळबळ उडाल्याचं चित्र आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील देवरियामध्ये घडली असून या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : ठाणे : कन्स्ट्रक्शन साईटवर 7 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार, 45 वर्षीय मजूराचे कृत्य

दीर-वहिनीच्या अफेयरबाबत नवऱ्याला समजलं....

घडलेल्या घटनेनुसार, दीर-भाऊजयी म्हणजेच वहिनी अनेक दिवसांपासून जवळ येत होते. ते घरात गुपचूप भेटायचे, जेव्हा पतीला दोघांच्या अफेयर्सबाबत माहिती समजताच, त्याने त्या दोघांवर कडक निर्बंध लादले. त्यांचे प्रेम अधिक बहरले आणि ते अधिकच जवळ आले. 

बायको आणि भाऊ दोघेही गायब झाल्याने नवऱ्याला मोठा धक्का 

दरम्यान, रविवारी संधी साधूनही वहिनी आपल्याच नवऱ्याच्या भावासोबत घरातून पळून गेली. तिने आपल्यासोबत दागिने आणि रोख रक्कम घेतली. जेव्हा नवरा घरी परतला असता, त्याला त्याची बायको आणि भाऊ दोघेही गायब असल्याचे आढळले. घराची अवस्था बघून त्याला मोठा धक्का बसला होता. 

हे ही वाचा : Astrology : काही राशींना आर्थिक फायदा होणार, तर 'या' राशीतील लोकांच्या करिअरमध्ये प्रगती होईल

चिंतेत असलेल्या पतीने दोघांनाही शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याला सापडला नाही. अखेरीस त्याने कारवाईची मागणी करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणात पोलिसांनी सांगितलं की, तक्रार प्राप्त झाली असून याबाबत पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, देशभरात अशा अनैतिक संबंधांच्या अनेक घटना घडू लागलेल्या आहेत. अशा घटनांमुळे नात्याला काळिमा फासणाऱ्या असंख्य घटना घडू लागलेल्या आहेत.